आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात कामगारांची संख्या दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. परंतु त्यांच्या हाताला पुरेसे काम उपलब्ध होत नसल्याने संघर्ष वाढत आहे. डिसेंबरमध्ये देशातील बेरोजगारी दर प्रचंड वाढला. डिसेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत बेरोजगारी दर उपलब्ध कामगारांच्या संख्येच्या तुलनेत ८ टक्क्यांहून जास्त आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयइ) प्रमुख महेश व्यास यांच्या मते २०२० मध्ये पहिल्या लॉकडाऊननंतर हा दर ६ टक्के ते ८ टक्क्यांहून पुढे गेला नाही. साप्ताहिक डेटानुसार बेरोजगारांची संख्या वाढली. परंतु त्यांच्यासाठी नाेकऱ्या नाहीत.
१८ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात शहरी भागांत बेरोजगारीचा निर्देशांक १०.९ टक्के होता. या काळात ग्रामीण बेरोजगारी ८.४ टक्के होती.नोव्हेंबरमध्ये हा दर ७.६ टक्के होता. व्यास म्हणाले, गेल्या काही महिन्यांत वाढलेली बेरोजगारी काहीशी चिंताजनक आहे. कृषी क्षेत्रातील कामगारांची हंगामी उपलब्धता यास तर्कसंकत ठरवता येणार नाही. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत भारतात रब्बीच्या हंगामातील कापणी आतापर्यंत चांगली राहिली. यंदा आतापर्यंत रब्बीची ९१ टक्के पीक कापणी झाली आहे. दोन वर्षांपासून हा आकडा ८८ टक्क्यांवर होता.
खूशखबर आणखी बाकी : जानेवारी-मार्चच्या चौथ्या तिमाहीत सेवा क्षेत्रात ७७ % कंपन्या भरती वाढवतील
टीमलीजच्या ताज्या अहवालातून जानेवारी ते मार्चपर्यंतच्या चौथ्या तिमाहीत भारतात नोकऱ्यांच्या संधी मिळत राहतील. त्यातही सेवा क्षेत्रात असतील. ७७ कंपन्या अशी योजना आणू शकतात.
उद्योग जाने.-मार्च - ऑक्टो-डिसें.
2022-23 2022-23
ई-कॉमर्स-स्टार्टअप 98% 92%
आयटी 94% 96%
टेलीकम्युनिकेशन 94% 90%
फायनांशियल सर्व्हिस 88% 78%
लॉजिस्टिक्स 81% 75%
रिटेल 85% 79%
दिव्य मराठी एक्स्पर्ट
मदन सबनवीस, चीफ इकॉनॉमिस्ट, बँक ऑफ बडोदा {धर्मकीर्ती जोशी, क्रिसिल
अशा वाढतील नोकऱ्या : वस्त्रोद्योगासह लेदर, मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन हवे
आगामी काही दिवसांत अर्थव्यवस्थेचा वेग मंदावू शकतो. रोजगारातील वाढीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून परिस्थिती सावरली जाऊ शकते. मार्चपर्यंत आर्थिक घडामोडी वाढल्यानंतर अनेक क्षेत्रात नोकऱ्या वाढू शकतात. बांधकाम, स्टिल, केमिकल, हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, ऑटो क्षेत्रातील स्थिती मात्र बदलेल असे चित्र नाही. रिटेल क्षेत्रही स्थिर राहू शकते. सॉफ्टवेअर क्षेत्रातील कामगिरीदेखील अपेक्षेपेक्षा कमी राहू शकते, असे दिसून येते.
रोजगार वाढीसाठी चार उपाययोजना करणे शक्य
1. मॅन्युफॅक्चरिंग, वस्त्रोद्योग, लेदर उद्याेगांस प्रोत्साहन द्या
2. आरोग्य, शिक्षणासारख्या सेवा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यावे.
3. व्होकेशनल ट्रेनिंगची इकोसिस्टिम उभे करून रोजगार वाढवता येऊ शकतो.
4. कामगारांची जास्त गरज भासेल, अशा उद्याेगांना सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.
गावांत रोजगार दर जास्त, बेरोजगारीही तितकीच
गावांत बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. रोजगार दरही जास्त आहे. डिसेंबरमध्ये सरासरी ग्रामीण रोजगार दर नोव्हेंबरच्या ३७.५ टक्क्यांच्या तुलनेत ३८.६ टक्के होता. कामगारांची भागीदारी ४२.२ टक्के वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.