आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका बँक अधिकाऱ्याने आपल्याच बँकेत ३४.१ कोटी रुपयांचा घोटाळा केला. अधिकाऱ्याचे नाव बेदांशु शेखर मिश्रा आहे. त्याने सर्व रक्कम जुगारात लावली आणि तो हरला. प्रकरण दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कँपसच्या खालसा महाविद्यालयातील पंजाब अँड सिंध बँकेशी संबंधित आहे. घोटाळ्याची माहिती लक्षात आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक वरिंदरपालसिंग यांनी सीबीआयकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, मिश्रा यांनी कॉलेजच्या पार्किंग अकाउंट व अन्य कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कम आरटीजीएसद्वारे विविध बनावट खात्यांत वर्ग करून काढली. यासाठी त्याने बँकेच्या सिस्टिममध्ये अन्य कर्मचाऱ्यांच्या आयडीचा वापर करून काही अज्ञात लोकांसोबत मिळून फेरफार केला. बँकेला घोटाळा लक्षात आल्यानंतर चौकशी केली. त्यात ही करामत समोर आली. मिश्राने २ बनावट खाती उघडली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.