आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Only Vinayak Idol In The World With A Human Face Is Installed At Tiltarpanpuri In Tamil Nadu

तामिळनाडूहून लाइव्ह रिपोर्ट:जेथे श्रीरामांनी दशरथांचे तर्पण केले, तेथे मानवी स्वरूपातील गणेश

आर. रामकुमार|तिलतर्पणपुरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तामिळनाडूच्या तिलतर्पणपुरीत मानवाचे मुख असलेली जगातील एकमेव विनायक मूर्ती स्थापित

भगवान गणेशाचे गजमुख म्हणजे गजानन रूप सर्वांनी पाहिले आहे. याच रूपात गणेशाची पूजाही होते. पण तामिळनाडूच्या एका प्राचीन मंदिरात नरमुख मूर्तीची पूजा होते, हे आपल्याला माहीत आहे का? तिरुवरूर जिल्ह्याच्या तिलतर्पणपुरीमध्ये आदि विनायक मंदिरात नरमुख गणेश स्थापित आहेत. येथे गणेशासोबत देवी पार्वतीचीही पूजा होते. असे म्हटले जाते की, हे जगातील हे एकमेव स्थान आहे जेथे भगवान गणेशांच्या नरमुख मूर्तीची मूजा होते. या प्राचीन मंदिराच्या महत्त्वाबाबत येथील पुजारी नरसिंहन सांगतात की, पितृपक्षात येथे भाविक तिळाने तर्पण करतात. ही परंपरा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पाळली जाते. त्यामुळे या स्थानाला दक्षिणेची गयाही म्हटले जाते. नरसिंहन सांगतात की, येथेच भगवान श्रीराम यांनी आपले पिता राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे तर्पण केले होते. त्यामुळे या स्थानाचे महत्त्व गया, काशी, रामेश्वरम, श्रीवन्चियम, थिरुवेकाडू आणि त्रिवेणी संगम या तीर्थक्षेत्रांएवढेच आहे. तेथे पूर्वजांचे तर्पण केले जाते.

महादेवाने दिले होते गणपती नाव- पौराणिक कथांनुसार, नरमुख गणेशाचे शिर भगवान महादेवांनी कापले होते. त्यानंतर त्यांना जिवंत करण्यासाठी हत्तीचे मुख लावण्यात आले. महादेवांनीच गणेशांना ‘गणपती’ नाव दिले. त्याचा अर्थ सेनापती असा होतो. महादेवांनी त्याच वेळी गणेशांना नेहमी सर्वप्रथम पूजनीय होण्याचे वरदानही दिले होते.

बातम्या आणखी आहेत...