आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना देशात लसीकरणाचा वेग वाढण्याऐवजी कमी होत आहे. २१ जूनपासून देशात सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा झाली हाेती. कोविन पोर्टलच्या आकड्यांनुसार, २१ ते २७ जूनदरम्यान रोज सरासरी ६१.१४ लाख डोस दिले जात होते. २८ जून ते ४ जुलैदरम्यान ४१.९२ लाख डोस देण्यात आले, तर गेल्या आठवड्यात म्हणजे ५ ते ११ जुलैदरम्यान हा आकडा घटून ३४.३२ लाख डोसवर आला.
हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांत २१ ते २७ जूनदरम्यान दैनिक लसीकरण घटले आहे. गेल्या काही दिवसांत आसाम आणि त्रिपुरात रुग्णवाढ होत आहे. दरम्यान, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या १.५४ कोटी डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
दर महिन्याला तीन कोटी डोस हवे : आरोग्यमंत्री टोपे
महाराष्ट्राला १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यासाठी दर महिन्याला किमान तीन कोटी डोस हवे, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात डोसची टंचाई असून केंद्र सरकारने ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.