आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Pain Of Wife Abuse; One Of Them Ran To The Court While The Other Reached The Police Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पत्नीच्या छळाच्या व्यथा; एकाची कोर्टात धाव तर दुसरा पाेहोचला पाेलिस ठाण्यात

नवी दिल्ली, चेन्नईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम्हाला दाेन पत्नी, आम्ही हस्तक्षेप करणार नाही : कोर्ट
  • जेथे गेलाे नाही ते लाेकेशन दाखवते गुगल : पतीची व्यथा

नवी दिल्ली : तुम्हाला दाेन पत्नी, आम्ही हस्तक्षेप करणार नाही : कोर्ट

विवाहित असतानाही दुसरे लग्न करून पत्नीची फसवणूक केल्याचा आराेप असलेल्या व्यक्तीने दिलासा मिळण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. न्या.एन.व्ही.रमणा यांच्या खंडपीठाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला. तुमच्या दाेन पत्नी असल्याने हस्तक्षेप करणार नाही, असे न्यायालयाने सांगितले. केरळच्या व्यक्तीवर फसवणूक करून दुसरा विवाह केल्याचा आराेप आहे. अजामीनपात्र वाॅरंटला स्थगिती मिळवण्यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली हाेती. आपली फसवणूक केल्याचा युक्तिवाद त्याने केला. याचिकाकर्त्याला फटकारताना न्या. रमणा यांनी तुम्ही कलम ४९४ अंतर्गत फाैजदारी कारवाईच्या अधीन आहात, मग आम्ही कसा हस्तक्षेप करणार, असे सांगितले.यावर या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असे याचिकाकर्त्याने सांगितले. त्यावर काेर्ट म्हणाले, तुम्ही वाद का घालता आहात ? चार दिवसांत सरेंडर करा.

...मग पीडितेची हत्या काेणी केली ? : न्या. रमणा

मारहाणप्रकरणी दोषी व्यक्तीच्या बाजूने युक्तिवाद करताना वकील स्वामी विक्रम हेगडे म्हणाले, माझ्या अशिलाने काहीही केले नाही. त्याला गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्यात आले आहे. यावर न्या. रमणा यांनी मग पीडितेची हत्या कोणी केली? का देवाने येऊन ठार केले? उच्च न्यायालयाने कोणत्या आधारावर शिक्षा ७ वर्षांवरून कमी करून २ वर्षे केली, असे फटकारत याचिका फेटाळून लावली.

चेन्नई : जेथे गेलाे नाही ते लाेकेशन दाखवते गुगल : पतीची व्यथा

तामिळनाडूतील के.आर.चंद्रशेखरन या युवकाने गुगल मॅप्सने आपल्या वैवाहिक आयुष्यात विष कालावले असल्याचा आराेप केला आहे. जेथे मी गेलाेही नाही अशी ठिकाणे यावर दाखवली जातात. त्याहीपेक्षा जेव्हा माझी पत्नी यावरील युवर टाइमलाइन हे फीचर दाखवते तेव्हा तर जास्त डाेकेदुखी वाढते आणि कुठे हाेता, अशा प्रश्नांची सरबत्ती करून ती हैराण करून साेडते. ती याच गाेष्टीचा विचार करत असल्याने त्याचा आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला आहे. या सगळ्या वादात आपणास झाेपायलाही मिळत नाही अशी कैफियत या तरुणाने आपल्या आराेपात मांडली आहे.नागपट्टिणम जिल्ह्यातील मईलादुथुराईमधील ४९ वर्षांचे चंद्रशेखरन यांनी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपली पत्नी गुगल मॅपवर जास्त विश्वास ठेवते. गेल्या काही महिन्यांपासून ती सातत्याने गुगल मॅपवरील युवर टाइमलाइन फीचर बघते व त्यामुळे ती झाेपू शकत नाही असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. मी माझ्या पत्नीच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही व कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्र व समुपदेशक यांनी समजावून सांगितल्याचाही तिच्यावर परिणाम झालेला नाही. मी खरे बाेलत असतानाही ती मान्य करत नाही. गुगलच्या विराेधात कारवाई करा व मला न्याय द्या, असे त्याचे म्हणणे आहे.

 

बातम्या आणखी आहेत...