आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकमध्ये पंचमसाली लिंगायत समाजाने भाजप सरकारच्या आरक्षित कोट्याचा प्रस्ताव फेटाळला आहे आणि नव्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वर्षी राज्य विधानसभा निवडणूक पाहता बोम्मई सरकारने राज्यातील राजकीयदृष्ट्या प्रभावी समाजास ओबीसीच्या एका नव्या २ डी श्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय नुकताच घेतला. मात्र, त्यांचा कोटा किती वाढला हे स्पष्ट नाही. मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर याचा निर्णय होईल. सध्या ते ३ बी श्रेणीत आहेत आणि त्यांना ५% आरक्षण मिळत आहे. त्यांची मागणी २ए श्रेणीत समाविष्ट करून त्याअंतर्गत १५% आरक्षण आहे.
सरकारी सूत्रांनुसार २ ते ३ टक्के कोटाच वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, वोक्कालिगा आणि लिंगायत समाजाच्या आरक्षण मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक दुर्बल घटकांसाठी(ईडब्ल्यूएस) आरक्षित कोट्याचा वापर करण्याच्या विचारात आहे. त्याला ब्राह्मण संघटनेने विरोध दर्शवला आहे. सरकारची कृती ब्राह्मणविरोधी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष आणि माजी महाअधिवक्ता अशोक हरननहल्ली यांनी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले की, सरकारचा प्रस्ताव ब्राह्मण स्वीकारणा नसून समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे त्यास विरोध करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.