आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Parents Told The Court That The Girl Was Corona Because She Did Not Like The Boy

मध्य प्रदेश:मुलगा पसंत नसल्याने पालकांनी कोर्टात मुलीस कोरोना झाल्याचे सांगितले, ती 14 दिवसांसाठी क्वॉरंटाइन!

खंडवा / सदाकत पठाण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेमविवाहासाठी कोर्टात आलेल्या तरुणीस कोरोना झाल्याचे एेकताच घाबरले वकील व टायपिस्ट

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्हा न्यायालयात बुधवारी तरुण-तरुणी विवाहासाठी शपथपत्र तयार करण्यासाठी आले होते. तेवढ्यात तिचे पालक तिथे आले. त्यांनी सांगितले, वकीलसाहेब, तुम्ही या मुलीपासून दूर राहा. कारण तिला कोरोना झाला आहे. इतकेच नव्हे तर पालकांनी आरोग्य विभागाच्या हेल्पलाइन क्रमांक १०४ वर कोरोना पॉझिटिव्ह तरुणी विवाहासाठी शपथपत्र तयार करत आहे, अशी तक्रारही नोंदवली. कोरोना असे नाव ऐकताच वकील आणि टायपिस्टमध्ये खळबळ उडाली. तरुणीचे शपथपत्र तयार करणारे वकील वीरेंद्र शर्मा त्यांच्यापासून तत्काळ दूर गेले.

नंतर हात जोडून त्या जोडप्यास म्हणाले, तुम्ही आधी कोरोनाची तपासणी करून घ्या. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर माझ्याकडे या. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत. अशा परिस्थितीत कोणताही वकील तुमची केस घेण्यास तयार होणार नाही. दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक तेथे आले. त्यांनी तरुणीला जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे तिचा स्वॅब घेतला आणि १४ दिवसांसाठी तिला क्वॉरंटाइन केले. अमलपुरा भागातील १९ वर्षीय तरुणीचे एका तरुणावर प्रेम होते. तरुणाच्या घरच्यांना मुलगी पसंत होती. तरुणीच्या पालकांना मात्र तरुण पसंत नव्हता. परंतु तरुणीचा हट्ट कायम होता. म्हणून ते दोघे कोर्टात गेेले. तरुणीच्या पालकांनी कोरोनाचा वापर करून हेल्पलाइनवर तक्रार केली आणि तिला घरीच बसवले.

तरुणी म्हणाली - कोरोना हरेल व प्रेम जिंकेल
कोरोना स्वॅबमुळे हे प्रकरण १४ दिवस पुढे ढकलले गेले आहे. तरुणीला वाटते, कोरोना महामारीपुढे माझ्या प्रेमाने हार पत्करली नाही. आता नाही तर आम्ही दोघे एकत्र येणारच आहोत. वकील वीरेंद्र शर्मा म्हणाले, लग्नासाठी आलेल्या मुलीची प्रकृती चांगली वाटत होती. मी तिच्याशी बोललाे आहे. कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. लग्न रोखण्यासाठी पालकांनी खेळलेली चाल आहे. त्यामुळे त्यांनी कोर्टात येऊन गोंधळ घातला. मात्र, तरुणीस अहवालाची प्रतीक्षा आहे.