आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The People Are Now Suffering The Consequences , Indians Did Not Learn A Lesson From The US And Did Not Make Any Preparations: Dr. Madad

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला धक्का:अमेरिकेकडून ना धडा घेतला ना कोणती तयारी करू शकला, त्याचा परिणाम आता जनता भोगत आहे : डॉ. मडाड

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या कोविड रिस्पॉन्स टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. सायरा मडाड - Divya Marathi
अमेरिकेच्या कोविड रिस्पॉन्स टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. सायरा मडाड
  • अमेरिकेच्या कोविड रिस्पॉन्स टास्क फोर्सच्या सदस्य डॉ. मडाड म्हणाल्या, पारदर्शक माहिती व चाचणीची गरज

लसीकरणाची मंदावलेली गती काेराेना विषाणूला भारतात म्युटेट हाेण्यासाठी पूर्ण संधी देत असून ताे जगासाठी धाेका ठरू शकताे. भारताकडून ज्या तयारीची अपेक्षा हाेती ती अपुरी पडली ही दुर्दैवाची गाेष्ट अाहे, असे मत व्यक्त केले अाहे ते अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटी हेल्थ हॉस्पिटल साखळीच्या वरिष्ठ संचालक डॉ. सायरा मदाड यांनी. अमेरिकेतील ही सर्वात मोठी शहरी आरोग्य संस्था आहे. डॉ. मादाड न्यूयॉर्कमधील कोविड टेस्ट, ट्रेस अँड टेक केअर प्रोग्राम कोविड लस संपर्क कार्यगटाच्या प्रमुखही आहेत. भास्करच्या रितेश शुक्ला यांच्याशी झालेल्या वार्तालापाचा हा प्रमुख भाग..

तुमच्या म्हणण्यानुसार लोक काय करू शकतात?
सर्वप्रथम, खोटा प्रचार व उपचार टाळण्याची आवश्यकता आहे. एकदा मला विचारण्यात आले होते की चिनी खाद्यांमुळे काेराेना संसर्ग हाेऊ शकताे का? बरेचसे लाेक फळे-भाजीपाला अाणून ब्लीचिंग पावडरने धूत अाहेत, कागदाचा स्पर्श टाळत अाहेत. या सर्व वेळ वाया घालवणाऱ्या गाेष्टी अाहेत. खोटेपणा आणि जास्त गर्दी टाळा, मास्क घाला, स्वच्छ राहा आणि लस घ्या.

महामारीच्या सध्याच्या स्थितीकडे कसे बघितले पाहिजे ? यातून कधीपर्यंत सुटका हाेऊ शकते?
अाताही अापण सर्वच जागतिक काेविड महामारीच्या अाणीबाणीच्या टप्प्यात असून या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी २ वर्षे लागू शकतात. महामारी एकदम संपत नाही. जागतिक महामारी कमी झाल्यानंतरही जगाच्या विविध भागात समस्या निर्माण हाेऊ शकतात. १९१७-१८ मध्ये अालेल्या स्पॅनिश फ्ल्ूमुळे अाताही संसर्ग हाेत असून त्यापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी फ्लू शाॅट‌्स घ्यावे लागतात हे लक्षात घेतले पाहिजे. काेविडही अायुष्यभर राहणार अाहे. मास्क, लस अाणि भक्कम अाराेग्य सुविधांच्या बळावरच या विषाणूपासून बचाव हाेऊ शकताे.

भारतातील काेविड संसर्गाच्या सद्य:स्थितीबाबत अापण किती परिचित अाहात?
मी न्यूयॉर्कमध्ये असून जगभरातील लाेक येथे राहतात. परिणामी काेविडच्या जगभरात हाेणाऱ्या संसर्गाबद्दल जागरूक राहावेच लागते. त्यामुळे भारतातील परिस्थिती मी जाणते. भारतासारख्या देशांमध्ये या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता आणि तयारी पुरेशी नव्हती हे खेदजनक अाहे. दुसऱ्या लाटेमुळे भारताला धक्का बसला ही अाश्चर्याची गाेष्ट अाहे. अमेरिकेच्या तुलनेत भारतातील अाराेग्य पायाभूत सुविधा कमकुवत अाहेत. पण तरीही भारताने अमेरिकेकडून धडा घेत वेळ असतानाही काेणती तयारी केली नाही. त्याचा परिणाम अाता जनतेला भाेगावा लागत अाहे.

भारताने काय करण्याची गरज हाेती, जे ताे करू शकला नाही ?
माहितीमध्ये पारदर्शकता नाही ही भारताची माेठी समस्या अाहे. महामारीशी लढा देताना प्रामाणिक माहिती असणे सगळ्यात अावश्यक अाहे. अन्यथा विषाणूचे वर्तन काय अाहे हे कळणार कसे? भारतात एक नवीन कृती गट स्थापन झाल्याचे काही दिवसांपूर्वी एेकण्यात अाले. ही चांगली गाेष्ट असली तरी अाता खूप उशीर झाला अाहे. हे सगळे पाेहोचवणार कसे, हा माेठा प्रश्न अाहे. वेळेच्या अाधी अावश्यक ती वैद्यकीय सामग्री लाेकांपर्यंत पाेहोचवणे हे सर्वात माेठे अाव्हान अाहे. त्यासाठी पारदर्शक माहिती अाणि चाचणीची गरज अाहे. उपलब्धतेच्या दृष्टीने किती सामग्री हवी अाहे याचा अंदाज माहितीवरून बांधता येताे. त्यानंतर वितरण म्हणजे वाहतुकीची व्यवस्था करावी लागते. सुनामी, पावसाळा, बर्फाचे वादळ यासारख्या अापत्तीमध्ये काेविडबराेबरच अन्य अाजारांच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी हे सुनिश्चित करणेदेखील आवश्यक आहे. या सर्वच अाघाड्यांवर भारत अपयशी ठरला आहे. त्यामुळेच भारतात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता व बेड, औषधांचा अभाव जाणवत अाहे.

अशा स्थितीत येणाऱ्या महिन्यांमध्ये काेणत्या समस्या उद‌्भवू शकतात ?
नद्यांमध्ये तरंगणाऱ्या मृतदेहांची हृदय कालवणारी छायाचित्रे साऱ्या जगाने बघितली अाहेत. हे दृश्य अशा काळाचे आहे जेव्हा पावसाळा येणार आहे. हे तरंगते मृतदेह वेगवेगळ्या प्रकारच्या साथीच्या रोगांना जन्म देऊ शकतात. कोविडसमवेत आणखी एका साथीच्या रोगाचा सामना करण्याची भारताची तयारी अाहे का? पाण्यापासून संसर्गजन्य राेग निर्माण झाले तर भयानक चित्र निर्माण हाेऊ शकते. दुसरीकडे भारतात लसीकरणाचा वेगही खूप मंद अाहे. त्यामुळे विषाणूला म्युटेट हाेण्यासाठी संधी मिळू शकते

भारतातील सध्याच्या काेराेना व्हेरियंटच्या विराेधात काेणती लस प्रभावी अाहे?
विषाणूच्या विराेधात लस बऱ्याच प्रमाणात प्रभावी असल्याचा अमेरिकेचा अातापर्यंतचा अनुभव अाहे. पण भारतातील परिस्थिती वेगळी आहे. पारदर्शकतेअभावी, इथल्या क्लिनिकल चाचण्यांच्या निकालांचा डेटा पाहणे आणि त्यातून निष्कर्ष काढणे अवघड आहे. लसीलाही जुमानणार नाही असे विषाणूचा म्युटेशन येण्याची शक्यताही दुर्लक्षित करून चालणार नाही. पण असे झाले तर पुन्हा जगाला धाेका अाहे. या क्षणी वस्तुस्थिती अशी आहे की ही लस आजारी पडण्यापासून किंवा विषाणूमुळे हाेणाऱ्या मृत्यूपासून वाचवण्यात सक्षम आहे.

बातम्या आणखी आहेत...