आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान चुकीच्या पार्किंगविरोधात मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी असा कायदा आणणार आहे जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभे केले तर त्याला 1000 रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर अशा वाहनांचे फोटो काढून पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील.
गडकरी म्हणाले की, चुकीचे पार्किंग हा मोठा धोका आहे. शहरी भारतातील कारच्या वाढत्या संख्येमुळे चुकीच्या पार्किंगचे प्रकार घडत आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे कार असली तरी ते पार्किंगसाठी जागा तयार करत नाहीत. उदाहरणार्थ, दिल्लीतील रुंद रस्ते हे पार्किंगच्या जागा म्हणून विचारात घेतले जात आहेत.
पार्किंगबाबत नाराजी
गडकरींनी सांगितले की, त्यांच्या नागपुरातील घरात 12 गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा आहे आणि ते रस्त्यावर अजिबात पार्क करत नाहीत. आज 4 सदस्यांच्या कुटुंबाकडे 4 कार आहेत. दिल्लीचे लोक भाग्यवान आहेत असे दिसते. त्यांचे वाहन उभे करण्यासाठी आम्ही रस्ता तयार केला आहे.
पुढे गडकरी म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांसह सार्वजनिक वाहतूक भारतासाठी आवश्यक आहे. अमेरिकेत सफाई कामगारांकडेही गाड्या असतात. लवकरच देशातही अशी परिस्थिती निर्माण होईल. प्रत्येकजण कार खरेदी करत आहे.
कार विक्रीत दुप्पट वाढ
कार विक्रीच्या बाबतीत, कोरोनानंतर, कारच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर देशात तेजी दिसून आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मे 2022 मध्ये कार विक्री दुप्पट झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या मते, प्रवासी वाहनांची घाऊक विक्री मे 2022 मध्ये वाढून 2.5 लाख युनिट्सवर पोहोचली होती, जी गेल्या वर्षी मे मध्ये 1 लाख युनिट्सपेक्षा कमी होती.
यामध्ये दुचाकी व तीन चाकी वाहने वगळता कार व इतर वाहनांचा समावेश आहे. प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची एकूण विक्री या वर्षी मे महिन्यात 15 लाखांहून अधिक झाली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 5 लाखांपेक्षा कमी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.