आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • The Petitioner Stated That The Laborers Had No Money To Buy Rations; 'Government Gives Food, No Need Of Money,' Says Chief Justice

दिल्ली:याचिकाकर्ता म्हणाला, मजुरांकडे रेशन विकत घेण्यासाठी पैसे नाहीत; 'सरकारकडून भोजन मिळते, पैशाची गरज काय' सरन्यायाधीश

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • या १०-१५ दिवसांत सरकारी कामात हस्तक्षेप करणार नाही : सर्वोच्च न्यायालय

पवन कुमार 

लॉकडाऊन काळात पलायन करणाऱ्या मजुरांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या कामात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली. ते म्हणाले, साथरोगात सरकारला त्यांचे काम करू द्यावे. या १०-१५ दिवसात त्यांच्या कामात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. मजुरांकडे धान्य विकत घेण्यास पैसे नाहीत, असा युक्तिवाद होता. 

लाइव्ह सुनावणी : सरकार काहीच करत नाही असे कसे म्हणता : बोबडे

 • याची हर्ष मंदर यांचे वकील प्रशांत भूषण : ४ लाखांहून अधिक मजूर आश्रयगृहात राहात आहेत. सरकारने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला आहे तेथे एकालाही काेरोनाचा संसर्ग झालयास सर्वांना होईल. त्यांना घरी जाण्याची परवानगी द्यावी. मजुरांच्या कुटुुंबीयांना पैशाची गरज आहे. ४०% मजुरांनी पलायन केलेले नाही, असा आमचा सर्व्हे आहे.
 • महाधिवक्ता तुषार मेहता : सरकार हे प्रकरण खूप चांगले हाताळत आहे. आश्रयगृहात ठेवलेल्या व इतर ठिकाणी मजुरांना भोजन दिले जात आहे. अनेक संस्था यासाठी कार्यरत आहेत.
 • प्रशांत भूषण : प्रत्येक मजुरास भोजन मिळतेच असे नाही.
 • सरन्यायाधीश : मजुरांना भोजन वाटप होत नाही, असे आम्हाला वाटत नाही.
 • तुषार मेहता : भोजनाची गरज भागविण्यासाठी व तक्रारनिवारणासाठी हेल्पलाइन सुरू आहे. गृहमंत्रालय लक्ष देत आहे.
 • प्रशांत भूषण : मजुरांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा निकृष्ट आहे. ते खाण्यायोग्य नाही.
 • सरन्यायाधीश : आम्ही यातील तज्ज्ञ नाही. दखल देणार नाही.
 • प्रशांत भूषण : सरकारने दोन आदेश दिले. आश्रयगृहात मजुरांना भोजन देणार व घरमालक िकराया घेणार नाहीत. याचे पालन होत नाही
 • सरन्यायाधीश : सरकार काही करत नाही, असे कसे म्हणू शकता? सरकारचा स्टेटस रिपोर्ट वाचा. यावर सोमवारी सुनावणी होईल.
बातम्या आणखी आहेत...