आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Player Who Played The Hockey World Cup Had To Break Stones; Died In Ranchi; News And Live Updates

आर्थिक टंचाईचा सामना:हॉकी विश्वचषक खेळलेल्या खेळाडूला फोडावे लागले दगड; रांचीत निधन, 70 व्या वर्षी गोपाळ भेंगरा यांनी घेतला अखेरचा श्वास

तोरपा(खुंटी)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झारखंडमधील तिन्ही प्रशिक्षण केंद्रे कोरोनामुळे बंद, सर्व 75 खेळाडू घरीच; आर्थिक टंचाईचा सामना

१९७८ मध्ये अर्जेंटिनात हॉकी विश्वचषक खेळलेल्या गोपाळ भेंगरा यांनी सोमवारी रांचीत गुरुनानक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. तोरपा येथील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सैन्यात असलेले गोपाळ हॉकीचे चांगले खेळाडू होते. ७८ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले होते. यानंतर गावात येऊन त्यांनी आयुष्याची नवी सुरुवात केली. सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला, मात्र कोठही त्यांची निवड झाली नाही. आयुष्याच्या अखेरीस गोपाळ भेंगरा यांना दगड फाेडून उपजीविका चालवावी लागली. त्यांची रोजची कमाई होती फक्त ४०-५० रुपये.

७० व्या वर्षी गोपाळ भेंगरा यांनी घेतला अखेरचा श्वास
गोपाळ भेंगरासोबत खेळलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू सुशील तोपनो यांनी सांगितले की ते तापट होते. सैन्यात एएसपी पुरवठा कोर संघाकडून खेळायचे. त्यांच्या खेळात शक्ती जास्त होती. विरोधी खेळाडू त्यांच्यासमोर यायला घाबरायचे. १९७८ मध्ये ते निवृत्त झाले. काही वर्षे पश्चिम बंगालच्या मोहन बागान क्लबकडून फुटबॉलही खेळले. निवृत्त झाल्यावर सरकारला खेळाडूंचा वापर करता येत नाही आणि एका चांगल्या खेळाडूची अखेर वाईट होते.

शेवटच्या दिवसात दगडांना आकार दिला
गोपाळ यांना क्रिकेटपटू सुनील गावसकर ७५०० रुपये दरमहा मदत द्यायचे. अखेरच्या दिवसांत काम मिळत नसल्याने ते दगडांना आकार देत.

मुलींना १७ महिन्यांपासून पौष्टिक अन्न नाही, भातावर गुजारा
सलीमा टेटे आणि निक्की प्रधान ज्या केंद्रातून प्रशिक्षण घेऊन ऑलिम्पिकला गेल्या तेथील खेळाडू कांदा-मिठासोबत भात खाऊन मैदानात हॉकीचा सराव करत आहेत. राष्ट्रीय सामन्यांमध्ये राज्याला सुवर्ण-रौप्य मिळवून देणाऱ्या मुलींना १७ महिन्यांपासून पौष्टिक आहाराची रक्कम मिळालेली नाही. राज्यातील तीन मॉडेल प्रशिक्षण केंद्रांमध्ये ७५ महिला खेळाडू सराव करायच्या. कोरोनात एप्रिल २०२० मध्ये सर्वांना घरी पाठवण्यात आले. सिमडेगा हॉकी अध्यक्ष मनोज कोनबेगी यांनी सांगितले, दररोज १७५ रुपये मिळणार होते, मात्र मिळाले नाहीत. यामुळे मुलींना भात खाऊन मैदानात सराव करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...