आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Plight Of The State Since Uddhav Thackeray Became The Chief Minister, Rana Couple Accused In A Press Conference In New Delhi

दिल्लीत पत्रकार परिषदेत:उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा, राणा दांपत्याचा नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत आरोप

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे, अशी टीका खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केली.

आमदार रवी राणा म्हणाले की, इंग्रजांनी लावलेली कलमे अनेक महान व्यक्तींवर लावण्यात आली. हनुमान चालिसा म्हटल्याने आमच्यावर राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी इंग्रज काळापासूनच्या कायद्यावर मोठा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्राची दुर्दशा झाली, राज्यावरील अरिष्ट-साडेसाती टळण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा म्हणणार होतो. पण आम्हाला १४ दिवस तुरुंगात डांबले, राजद्रोहाचे कलम लावले, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. दरम्यान, राणा दांपत्य आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या अटींचे उल्लघंन केल्याने राणा दांपत्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...