आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या सारण जिल्ह्यात विषारी दारूकांडात गुरुवारी आणखी २० लोकांचा मृत्यू झाला. या मृतांपैकी १७ लोक खासगी रुग्णालयात किंवा घरी उपचार करत होते. तीन लोकांचा पीएमसीएचला हलवल्यानंतर मृत्यू झाला. मृतांमध्ये तीघे स्वत:च दारू विकत होते. हे सर्व मिळून मृतांची संख्या ५० झाली आहे. १३ लोकांवर उपचार सुरू आहे. यापैकी ११ जणांची दृष्टी गेली आहे.
दारूकांडामुळे या परिसरात शोककळा पसरली आहे. लोकांचा संतापही समोर आला आहे. एका मृताच्या नातेवाईकांनी आणि शेकडो ग्रामस्थांनी राज्य महामार्गावर मृतदेह ठेवून आंदोलन केले. नातेवाईकांच्या आरोपानुसार, स्थानिक पोलिस बळजबरीने थंडीने मृत्यू झाल्याचे सांगत अंत्यसंस्कारासाठी दबाव टाकत आहेत. यानंतर लोकांनी राज्य महामार्ग जाम केला.
दोन तास समजावल्यानंतर पीडित कुटुंब राजी झाले. अमनौर ठाणे क्षेत्रातील हुस्सेपूर तालुक्यताील मनिसिरिसिया गावचे सुरेंद्र सिंह (६० वर्षे) यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. याच गावातील चंद्रिका राम यांचा ३५ वर्षीय मुलाचा बुधवारी मृत्यू झाला. गावात विषारी दारूमुळे गुरुवारपर्यंत ७ लाेकांचा मृत्यू झाला.
मशरकच्या एका घरात ५ मृत्यू झाले. सर्वात जास्त मृत्यू तेथेच झाले. मृतांमधील सुरजचे लग्न याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाले होते. सर्वात जास्त नुकसान बहरौली तालुक्यात झाले आहे.
मद्य व्यावसायिकाचे कुटुंबही यात, आसमचा युवक रेल्वेत आजारी पडला मढौरा गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गावात एक व्हराड आले होते. या लग्न समारंभात काही लोकांनी दारूची पार्टी केली होती. ज्यांनी मद्य प्यायले होते त्यांची तब्येत बिघडू लागली. ग्रामस्थांनी मृताच्या कुटुंबाला सांगितले की, हे कुटुंब दारूच्या अवैध व्यवसायाशी संबंधित होते. खरौनी गावातील युवक छोटू बुधवारी आसामला जाणाऱ्या रेल्वेतूतन जात होता. मद्य प्यायल्याने त्याची रेल्वेत प्रकृती बिघडली.
संसदेत गोंधळ, भाजप म्हणाले- बिहार सरकार सामूहिक हत्या करत आहे बिहार दारूकांडाचा आक्रोश दिल्लीत संसदेपर्यंत घुमला. संसदेच्या दोन्ही सभागृहात या मुद्द््यावरून गोंधळ झाला. गोंधळामुळे कामकाज तीन वेळा स्थगित करावे लागले. लोकसभेत भाजपच्या खासदारांनी नितीशकुमार सरकारवर हल्ला चढवत सांगितले की, सरकार सामूहिक हत्या करत आहे. राज्यसभेत सुशीलकुमार मोदी म्हणाले, नितीश हताश आहेत. यामुळे जे मद्य पितील ते मरतील,असे वक्तव्य करत आहेत.
कारवाई : फौजदार, चौकीदार निलंबित, डीएसपीची बदली मशरक, इसुआपुर, आमनौर आणि मढौरामध्ये विषारी दारू कांडामुळे मशरथ फौजदार नीरज मिश्रा आणि चौकीदार विकेश तिवारी यांना निलंबित केले आहे. मढौराच्या डीएसपींची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.