आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Possibility Of A Concrete Decision On A One family one ticket Policy At The Congress Reflection Camp, Latest News And Update

काँग्रेसचे ऋण फेडण्याची वेळ:चिंतन शिबिरात 'एक कुटुंब-एक तिकिट' फॉर्म्युला होऊ शकतो लागू, गांधी कुटूंबापासून होणार सुरुवात?

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे 13 ते 15 मेपर्यंत उदयपूरमध्ये चिंतन शिबिर होणार आहे. त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या शिबिराच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये अमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस आगामी चिंतन शिबिरापासून पक्षात एक कुटुंब-एक तिकिट नियम लागू करु शकते.

काँग्रेसने हा नियम लागू केला तर पक्षाला भाजपकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर देता येईल. याशिवाय काँग्रेस समित्यांचा कार्यकाळही 3 वर्षे निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. चिंतन शिबिरात या सर्वच कळीच्या मुद्यांवर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारीच CWC च्या बैठकीत नेत्यांना पक्षाचे उपकार फेडण्याची वेळ आल्याचे महत्वपूर्ण विधान केले होते.

सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले होते.
सीडब्ल्यूसीच्या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले होते.

‘एक कुटुंब-एक तिकिट‘ नियमात असू शकते विशेष तरतूद

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस एक कुटुंब-एक तिकिट धोरणात विशेष तरतूदही करु शकते. त्यानुसार, हा नियम अंमलात आला तर पक्षात किमान 5 वर्ष काम करणारा नेता व पक्षात सक्रिय असणाऱ्या त्याच्या नातेवाईकाला तिकिट देण्यायोग्य मानले जाईल. असे झाले तर गांधी कुटूंबातील एकाहून जास्त सदस्यांना निवडणूक लढवता येईल.

इलेक्शन विंगवर होऊ शकतो विचार

चिंतन शिबिरात प्रचार मोहिमेचे व्यवस्थापन व समन्वय करण्यासाठी एक स्वतंत्र इलेक्शन विंग तयार करण्यावरही विचार होऊ शकतो. या विंगसाठी एक खास सरचिटणीस नियुक्त केला जाईल. याशिवाय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यावरही विचार केला जाऊ शकतो. या बैठकीत पक्षात 50 वर्षांहून कमी वयाच्या नेत्यांना सहभागी करुन त्यांच्यासाठी 50 टक्के मोठी पदे राखीव ठेवण्यावरही ठोस निर्णय होऊ शकतो.

राहुल गांधींना भारत दौरा करण्याची सूचना

दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक बड्या नेत्यांनी राहुल गांधींना भारत दौरा करण्याचा सल्ला दिला. राहुल यांनी देशभर दौरे केले तर पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांत उत्साह संचारेल. तसेच पक्ष संघटनाही मजबूत होईल, असा या नेत्यांचा व्होरा आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया म्हणाल्या- पक्षाचे ऋण फेडा, जादूची कांडी बळ देणार नाही

चिंतन शिबिरापूर्वी झाली बैठक

उदयपूरमधील प्रस्तावित चिंतन शिबिरापूर्वी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. त्यात शिबिरात होणाऱ्या सर्वच मुद्यांवर विस्तृत सल्लामसलत करण्यात आली. याशिवाय येत्या काही महिन्यांत होणाऱ्या काही विधानसभा निवडणुकांवरही यात चर्चा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...