आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​​​​​​​प्रणवदांच्या पुस्तकात दावा:नेपाळला भारतात विलीन व्हायचे होते, नेहरूंनी प्रस्ताव फेटाळला; इंदिरांनी सिक्कीमसारखे विलीन केले असते

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ पुस्तक बाजारात
  • लिहिले- असहमतीचे सूरही मोदींनी ऐकणे आवश्यक

माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे ‘ द प्रेसिडेन्शियल इयर्स’ हे पुस्तक मंगळवारी बाजारात आले. त्यात आणखी एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. त्यानुसार,‘नेपाळला भारतात विलीन व्हायचे होते. पण पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नेपाळचे राजे त्रिभुवन वीर विक्रम शाह यांचा प्रस्ताव फेटाळला होता. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे. त्याने नेहमी तसेच राहिले पाहिजे, अशी नेहरूंची त्यावर प्रतिक्रिया होती. तेव्हा पंडित नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी असत्या, तर कदाचित त्यांनी संधीचा फायदा घेतला असता. सिक्कीमबाबत त्यांनी तसे केलेही होते.’ मुखर्जींच्या या पुस्तकात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीबाबतही अनेक गोष्टी आहेत. एका ठिकाणी प्रणव लिहितात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असहमतीचे सूरही एेकायला हवेत. विरोधकांना राजी करणे आणि देशासमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांनी संसदेत आणखी जास्त बोलावे. मोदींची फक्त उपस्थितीच संसदेच्या कामकाजात अनेक बदल घडवू शकते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग या सर्व माजी पंतप्रधानांनी संसदेतील उपस्थिती जाणवून दिली आहे. मोदींनीही आपल्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन संसदेत उपस्थिती वाढवावी.’

पुस्तकानुसार, ‘मोदी सरकार पहिल्या कार्यकाळात संसद उत्तमरीत्या चालवू शकले नाही. यामागे अहंकार व कौशल्यहीनता असावी. मोदींनी ८ नाेव्हेंबर २०१६ला नोटबंदीची घोषणा केली. मात्र त्याआधी माझ्याशी (तेव्हा प्रणव हेच राष्ट्रपती होते) या मुद्द्यावर चर्चा केली नाही. तथापि, मला आश्चर्य वाटले नाही, कारण अशा घोषणा अचानकच कराव्या लागतात.’ प्रणव पुढे लिहितात, ‘मी यूपीए सरकारच्या काळात सातत्याने विरोधकांच्या संपर्कात होतो. सभागृहांमध्येही पूर्णवेळ उपस्थित राहायचो.’

जादुई नेतृत्व संपलेय, हे काँग्रेसला कळलेच नाही
प्रणव लिहितात, ‘मी राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय फोकस गमावला. आपले जादुई नेतृत्व संपलेय, हे पक्षाला कळलेच नाही. २०१४ मधील पराभवाचे हेही एक कारण असावे. या निकालांमुळे किमान निर्णायक जनादेश आला, ही मला दिलासादायक बाब वाटली. मात्र माझा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कामगिरीने निराश झालो.’

बातम्या आणखी आहेत...