आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Prime Minister Manmohan Singh On Narendra Modi Government The Prime Minister Should Make A Thoughtful Statement On The Issues Of Security And Strategy Of The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या मुद्द्यावर मनमोहन सिंहांचा मोदींना सल्ला:पंतप्रधानांनी देशाची सुरक्षा आणि रणनीतीच्या मुद्द्यावर विचारपूर्वक वक्यव्य करायला हवे, राहुल गांधी म्हणाले - आशा आहे मोदी हे ऐकतील 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते की - आपल्या सीमेत कोणीही घुसखोरी केली नाही
  • विरोधी पक्षाने विचारले - ही गोष्ट खरी असेल तर मग चीनसोबत चर्चा का सुरू होती, आपले जवान शहीद का झाले?
  • पीएमओचे स्पष्टीकरण - पंतप्रधानांनी 15 जूनला झालेल्या चकमकीवर भाष्य केले होते

चीनच्या मुद्द्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पहिल्यांदा भाष्य केले आहे. ते म्हणाले की, देशाची सुरक्षा, रणनीती आणि सीमेच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी विचारपूर्वीक वक्तव्य करायला हवे. या प्रकरणात त्यांनी केलेल्या भाष्याचा काय परिणाम होऊ शकतो याविषयी त्यांनी सावध राहायला हवे. शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत मोदींच्या वक्तव्यावरुन झालेल्या वादानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सोमवारी भाष्य केले. 

'सरकारने कोणतीही कमतरता सोडल्यास जनतेची फसवणूक होईल'

मनमोहनसिंग म्हणाले की सरकारने आपल्या सीमेची सुरक्षा करताना शहीद झालेल्या सैनिकांना न्याय मिळावा म्हणून काही मोठी पावले उचलायला हवीत. सरकारने कोणतीही कमतरता सोडल्यास ते देशातील जनतेचा विश्वासघात होईल.

माजी पंतप्रधान म्हणाले की आम्ही एका ऐतिहासिक टप्प्यावर आहोत. यावेळी सरकारचा निर्णय व कार्यवाही ठरवेल की भावी पिढी आपल्याबद्दल काय विचार करेल? आपल्या लीडरशिपला जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात. भारतीय लोकशाहीमध्ये ही पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी असते. 

राहुल म्हणाले - आशा आहे की, पंतप्रधान ही गोष्ट ऐकतील 

बातम्या आणखी आहेत...