आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Prime Minister Should Withdraw The Three Agricultural Laws; Appeal From Opposition In Parliament

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभेत गदारोळ:पंतप्रधानांनी मन मोठे करून तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत; संसदेत विरोधी पक्षांकडून आवाहन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिका उपराष्ट्राध्यक्षांच्या भाचीचा आंदाेलनास पाठिंबा

नवे कृषी कायदे व शेतकरी आंदोलनावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी दुसऱ्या दिवशी बुधवारीही संसदेत गदारोळ केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन मोठे करण्याची विनंती केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विषय सरकारने प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये आणि तिन्ही कायदे मागे घ्यावेत. आझाद यांनी वर्ष १९०० ते १९८८ पर्यंतच्या शेतकरी आंदोलनांची उदाहरणे देऊन सरकारला टोमणेही मारले. राज्यसभेत गदारोळ सुरू असतानाच सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी आम आदमी पक्षाचे संजय सिंहसह ३ सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित केले.

जिंदमध्ये शेतकऱ्यांची महापंचायत, टिकैत सहभागी
हरियाणात जिंद येथील शेतकऱ्यांच्या महापंचायतीत शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही सध्या सरकारकडे कायदे मागे घेण्याची मागणी करत आहोत. जर आम्ही सत्ता सोडण्याची मागणी केली तर सरकारचे काय होईल? तिन्ही कायदे मागे घेतले नाहीत तर ऑक्टोबरनंतर ४० लाख ट्रॅक्टरसह शेतकरी दिल्लीकडे कूच करतील.

अमेरिका उपराष्ट्राध्यक्षांच्या भाचीचा आंदाेलनास पाठिंबा
अमेरिकी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिसनेे शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा जाहीर केला तेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही विधेयके संसदेत मंजूर करूनच लागू झाली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक चौकशीची मागणी फेटाळली
प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बुधवारी म्हटले की, या हिंसाचाराबाबत कायदा आपले काम करेल असे पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य आम्ही ऐकले आहे. आम्ही चौकशीचा मुद्दा सरकारवर सोडत आहोत.

बातम्या आणखी आहेत...