आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Prime Minister Will Hold Discussions With The Chief Ministers Of 21 States At 3 Pm Today

मोदींनी बोलावली बैठक:पंतप्रधान आज 3 वाजता 21 राज्यांच्या मुख्यमंत्र्याची घेणार बैठक, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत करणार चर्चा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून होणार बैठक
Advertisement
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 वाजता 21 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. यामध्ये कोरोनाच्या सध्यपरिस्थितीवर चर्चा होईल. यासोबतच राज्यांच्या पुढील उपाययोजना काय आहेत याचा आढावा घेतला जाणार आहे. अनलॉक-1 च्या परिणामांवरही यामध्ये चर्चा होऊ शकते. 

आजच्या बैठकीत हे 21 राज्य/केंद्र शासित प्रदेश होणार सहभागी

पंजाबआसामकेरल
उत्तराखंडझारखंडछत्तीसगड
त्रिपुराहिमाचल प्रदेशचंदीगड
गोवामणिपुरनागालँड
लद्दाखपुडुचेरीअरुणाचल प्रदेश
मेघालयमिझोरामअंडमान-निकोबार
दादर नागर हवेली-दमन दीवसिक्किमलक्षदीप

राज्यांच्या मंत्र्यांसोबत 3 महिन्यात सहावी बैठक 
कोरोनाच्या संकटाविषयी पंतप्रधान मोदी मार्च महिन्यापासून सातत्याने चर्चा करत आहे. आज त्यांची सहावी बैठक होणार आहे. यापूर्वी 20 मार्च, 2 एप्रिल, 27 एप्रिल आणि 11 मे रोजी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे त्यांनी चर्चा केली होती. 

15 राज्य सर्वात जास्त प्रभावित 
पंतप्रधान मोदी हे सलग दोन दिवस मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. बुधवारी म्हणजेच उद्या महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंश्चिम बंगालसोबतच 15 राज्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वात जास्त केस आहेत. आतापर्यंत येथे 1 लाख 10 हजार 744 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीमध्येही कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. 

Advertisement
0