आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राउत यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटवरुन सरकारवर टीकस्त्र सोडले. राउत म्हणाले की, आपल्या देशात अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटसारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते. त्या अर्णब गोस्वामीमुळे महाराष्ट्रातील एका निरपराध व्यक्तीने आत्महत्या केली. अशा लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते.
राऊत पुढे म्हणाले की, ज्याने ऑफिशियल सीक्रेट कोड तोडत बालाकोट स्ट्राइकबद्दल होण्यापुर्वीच सांगितले, तो केंद्र सरकाराच्या शरणमध्ये आहे. त्याला तुम्ही सुरक्षा पुरवता. त्याच्याबद्दल विचारल्यावर तुम्ही शांत बसता.
'सरकारला प्रश्न करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते'
राउत पुढे म्हणाले की, काल धर्मेंद्र प्रधान बोलत होते आणि आमच्यावर टीका करू लागले. पण, देशात अशी परिस्थिती आहे की खर बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. जो सरकारला प्रश्न करेल, त्याला देशद्रोही ठरवले जाते.
'पत्रकार, लेखकांवर सरकार देशद्रोहाचे खटले दाखल करते'
राउत पुढे म्हणाले, ‘संसदेतील आमचे सहकारी संजय सिंह यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. राजदीप सरदेसाई नावाजलेले पत्रकार आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. सिंघु बॉर्डरवर रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि लेखकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जातो.’
'बहुमत अहंकाराने नाही, सर्वसम्मतीने चालते'
राउत पुढे म्हणाले की, ‘देशातील कायद्यातून IPC च्या सर्व कलमा संपवल्यात,असे वाटत आहे. आत फक्त देशद्रोहाची कलम लावली जाते. आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा आदर करतो आणि पुढेही करत राहू. त्यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे, पण बहुमत अहंकाराने नाही, तर सर्वसम्मतीने चालते.’
'200 शेतकरी तुरुंगात कैद, पण दीप सिद्धू मोकळा'
26 जानेवारीला लाल किल्यावर झालेल्या हिंसाचाराबाबत राऊत म्हणाले की, दीप सिद्धू कोण आहे, हे सरकार सांगत नाहीये. त्याला अद्याप पकडले नाही, पण 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तुरुंगात डांबले आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.