आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Promise Of Free Vaccines Is Not A Breach Of The Code Of Conduct, The Central Election Commission Explained

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पष्टीकरण:मोफत लसीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कल्याणकारी योजनांचे आश्वासन देण्यावर आक्षेप घेता येत नाही - निवडणूक आयोग

बिहार निवडणुकीत भाजपने दिलेले मोफत लसीचे आश्वासन निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांच्या तक्रारीला उत्तर देताना आयोगाने म्हटले आहे की, भाजपच्या या घोषणेमुळे निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्याही तरतुदीची अवहेलना झालेली नाही. सूत्रांनुसार आयाेगाने आदर्श आचारसंहितेच्या आठव्या भागातील निवडणूक जाहीरनाम्याच्या दिशानिर्देशांचा हवाला देत भाजपच्या या आश्वासनात कोणतीही विसंगती आढळली नाही. त्यात म्हटले आहे की, संविधानाने सर्व नागरिकांच्या कल्याणाच्या योजना आखण्याची जबाबदारी सरकारला सोपवली आहे आणि अशा कल्याणकारी योजनांचे आश्वासन देण्यावर आक्षेप घेता येत नाही. भाजपच्या मोफत लसीच्या आश्वासनावर विरोधकांनी चांगला आक्षेप घेतला होता. भाजप या महामारीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या राज्यातील नागरिक देशाचे नागरिक नाहीत का, त्यांना लस टोचली जाणार नाही का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.