आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:क्वाड गट दक्षिण आशियाला लसीचे 100 कोटी डोस देणार, पहिल्या बैठकीत चारही देशांनी दिली ग्वाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

क्वाड समुहात सहभागी भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया २०२२ अखेरीस आशियाई देशांना कोरोना लसीचे एक अब्ज डोस उपलब्ध करून देणार आहे. क्वाडच्या पहिल्या बैठकीत चारही देशांनी ही ग्वाही दिली. आग्नेय आशियाला लसीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी भारताकडे १०० कोटी डोस निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. अमेरिकन तंत्रज्ञानाचा भारत वापर करेल. जपानच्या लॉजिस्टिक क्षमतेचाही भारत वापर करेल. सामरिकदृष्ट्या भारत बळकट होत असल्याचे क्वाडच्या बैठकीतून दिसून आले आहे.

अफगाणिस्तानच्या बाबतीत भारताला सोबत घेऊन अमेरिका पहिल्यांदाच चर्चा करत आहे. आजचे जग आघाडीचे नसून भागीदारीचे आहे. आज एक देश दुसऱ्या देशाकडे भागीदार म्हणून पाहतो. अमेरिका भारतासोबत मैत्री व अमेरिका चीनसोबत सावधगिरीने पावले टाकत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो. बायडेन यांनी २४ पानांच्या राष्ट्रीय सुरक्षासंबंधी मार्गदर्शक तत्वाच्या पान क्रमांक १० वर काही मुद्दे मांडले. अमेरिका भारतासोबतची भागीदारी आणखी दृढ करणार आहे. हे बायडेन यांचे उद्दिष्ट आहे. त्यावरून अमेरिका इतर देशांसोबतचे आपले संबंध वाढवणार आहे, हे स्पष्ट होते. या दस्ताऐवजात दक्षिण चिनी सागरातील प्रश्न व जपासोबतच्या पूर्वेकडील सागरी समस्यांवर अमेरिकेने चिंताही व्यक्त केली. चीनचा विकास अमेरिकेच्या सहकार्यातून झाला आहे. आता या तीन देशांसोबत भारताची वाटचाल अगदी योग्य दिशेने सुरू झाली आहे.

क्वाड म्हणजे चीनच्या ब्लॅकमेलिंगवर उत्तराचा शोध सुरू
चीनच्या ब्लॅकमेलिंगपासून स्वत:चा बचाव हे क्वाडचे मूळ उद्दिष्ट आहे. प्रगत देशांना बदलत्या जागतिक परिस्थितीत चीनवर तोडगा काढायचा आहे. क्वाडच्या पहिल्यात बैठकीत वापरण्यात आलेले हवामान बदल, नवीन तंत्रज्ञान इत्यादी शब्दांना बारकाईने अभ्यासण्याची गरज आहे. स्मार्टफोन, संगणक, इलेक्ट्रिक कार, लढाऊ विमाने इत्यादी उपकरणे तयार करण्यासाठी दुर्मिळ खनिजांची गरज असते. तूर्त अमेरिकेसारख्या मोठ्या देशांचे चीनवर अवलंबित्व आहे. त्यामुळे चीन अशा देशांना ब्लॅकमेल करत आहे. ब्लॅकमेलिंगपासून बचाव करण्यासाठी अशा देशांना भागीदारी मजबूत करावी लागेल. भारत, अमेरिका व ऑस्ट्रेलियात एकूण मिळून जगातील सुमारे ११ टक्के दुर्मिळ खनिजाचा भंडार आहे. या खनिजाचे जपान व अमेरिका मोठे खरेदीदार आहेत. खनिज आयातीपैकी ८० टक्के भाग चीनचा आहे. ही गरज लक्षात घेऊन क्वाड बळकट होऊ शकतो. कदाचित पुढे क्वाड प्लसही होऊ शकतो. रशिया या आघाडीच्या सामरिक घडामोडींची चिंता सोडून त्याचे मूल्यांकन करू शकतो. कारण रशियात दुर्मिळ खनिजसंपत्तीने संपन्न आहे. बलाढ्य रशियाला चीनच्या ब्लॅकमेलिंगची देखील भीती नाही. : फियोडोर लुक्यानोव्ह, चेअरमन, प्रेसिडियम ऑफ द काैन्सिल फॉर फॉरेन अँड डिफेन्स पॉलिसी

बातम्या आणखी आहेत...