आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Racism Of Restaurants In America: Rude Behavior With The Family Of Famous Entrepreneur Kumar Mangalam Birla

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतील रेस्तराँचा वर्णभेद:प्रसिद्ध उद्योजक कुमारमंगलम बिर्ला यांच्या कुटुंबीयांसोबत असभ्य वर्तन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
आई-वडिलांसोबत अनन्या बिर्ला.
  • मला व कुटुंबाला बाहेर हाकलले : अनन्या बिर्ला, रेस्तराँने आराेप फेटाळले

प्रसिद्ध उद्याेजक कुमारमंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्याने अमेरिकेतल्या एका रेस्तराँवर वर्णभेदाची वागणूक केल्याचा आराेप केला आहे. वाॅशिंग्टनमधील स्काेपा इटालियन रूट्स या रेस्तराँने त्यांना कुटुंबीयांसहित बाहेर हाकलल्याचे अनन्याने साेशल मीडियावर सांगितले.

रेस्टॉरंटला टॅग करत अनन्याने म्हटले की, ‘रेस्तराँने मला व कुटुंबाला त्यांच्या आवारातून बाहेर काढले. हे अत्यंत वर्णद्वेषी आहे. त्यांनी ग्राहकांशी योग्य मार्गाने वागले पाहिजे. वेटरने आईशी असभ्य वर्तन केले. आम्ही तुमच्या रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी ३ तास प्रतीक्षा केली. शेफ अँटोनियो व वेटर जोशुआ सिल्व्हरमनची माझ्या आईबद्दलचे वर्तन अत्यंत असभ्य हाेते, जे वर्णभेदी हाेते. हे बराेबर नाही.’ अनन्याचा भाऊ आर्यमान म्हणाला, ‘मला यापूर्वी कधीही असा अनुभव आला नाही. वंशवाद अस्तित्वात आहे आणि ते सत्य आहे.’

रेस्तराँने आराेप फेटाळले

रेस्तराँने अनन्याचे आराेप फेटाळले आहेत. रेस्तराँचे एक भागीदार पाब्लाे माेइक्सने सांगितले की, ‘अनन्या आणि तिच्याबराेबरचे लाेक जेवण करेपर्यंत थांबले हाेते. राज्याच्या कायद्यानुसार मद्यपानसाठी आेळखपत्रे मागितल्यानंतर दाेन लाेकांकडे फक्त आेळखपत्र हाेते व उरलेल्यांकडे केवळ त्याच्या प्रती हाेत्या. त्यानंतर सर्वकाही ठीक झाले आणि त्यांनी आपले भाेजन केले. इतकेच नाही तर दाेन्ही वेटर आणि भाेजन यांच्या गुणवत्तेचे काैतुकही केले.’