आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमध्ये गंगोत्री व यमुनोत्री धाम जोडणाऱ्या १२१ किलोमीटर लांब रेल्वेमार्गाचा अंतिम आराखडा तयार झाला आहे. या रेल्वेमार्गाचा ७० टक्के भाग बोगद्यांतून जाणार आहे. या प्रकल्पात १७ किलोमीटर एवढा देशातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार होणार आहे. हा रेल्वे बोगदा टिहरी जिल्ह्यात जाजल ते मरोडदरम्यान होईल. प्रकल्पात एकूण २० बोगदे तयार केले जातील. पुढील दहा वर्षांत उत्तराखंड रेल्वेचे सर्वाधिक बोगदा मार्ग असलेले राज्य ठरेल. राज्यात ६६ बोगदे प्रस्तावित आहेत. सध्या १८ बोगदे सुरू आहेत. हिमालयीन राज्य उत्तराखंडमध्ये बोगद्यांचे जाळे वाढेल. त्यामुळे संपर्कात वाढ होईल. चीनशी लगत असलेल्या सीमांना सुरक्षित ठेवण्यासाठी ऑल वेदर रोडही लष्कराच्या मदतीसाठी महत्त्वाचा ठरेल. परंतु हिमालयातील संवेदनशील भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यास या बोगद्यांमुळे भूकंपांचा धोकाही वाढू शकतो, असा इशारा काही तज्ञांनी दिला.
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पात १७ बोगदे
ऋषिकेश, कर्णप्रयाग रेल्वे प्रोजेक्टचे अर्धे काम झाले आहे. प्रकल्पाचा ७० टक्के भाग बोगद्यांचा आहे. येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाची १४ किमी लांबीचा बोगदा देवप्रयाग ते जनासूपर्यंत निर्माणाधीन आहे. एकूण १७ बोगदे तयार केले जात आहेत.
नॉर्वेमध्ये ९०० बोगदे
बोगद्यांमुळे हिमालयीन क्षेत्राला जास्त धोका नाही. नॉर्वेसारख्या डोंगराळ देशात ९०० पेक्षा जास्त रोड-रेल्वे बोगदे आहेत. बोगद्यांच्या उभारणीत भारतातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. म्हणून बोगद्यांमुळे फार धोका असल्याची शंका घेऊ नये.
-प्रो. एमपीएस बिष्ट, संचालक यूसेक
हिमालय सर्वात कच्चा डोंगर
हिमालय जगातील सर्वात नवा, कच्चा मानला जातो. संशोधनानुसार मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्पांमुळे भूस्खलनाचा धोका वाढू शकतो. बाेगद्याच्या बांधकामावेळच्या ढिगाऱ्यांचा निचरा हीदेखील समस्या ठरते.
-प्रो. एसपी सती, एचओडी, उत्तराखंड वानिकी विद्यापीठ.
डेहराडून व टिहरीदरम्यान ३० किमी लांब जगातील सर्वात लांबीचा बोगदा होणार : डेहराडून-टिहरीदरम्यान जगातील सर्वाधिक लांबीचा ३० किमी बोगदा मार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे डेहराडून-टिहरीमधील अंतर १०५ किमीने कमी होईल. तीन तासांचा अवधी एक तास एवढा होईल. बोगद्याच्या दोन्ही बाजूला अप्रोच रोड हा प्रकल्पाचाच भाग असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.