आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून:पावसाचा मुक्काम तीन-चार दिवस वाढला, हवामानाच्या दोन सिस्टिमचा परिणाम

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात दोन वेगवेगळ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनचा मुक्काम वाढला असून परतीच्या वाटेवरील पाऊस महाराष्ट्र तसेच ईशान्येत अडकला आहे. दरम्यान, केरळमध्ये शनिवारी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती आहे.

यंदा परतीला उशीर : साधारणपणे १७ सप्टेंबरला परतणारा मान्सून ६ ऑक्टोबरपासून परतीला लागला. देशाचा विचार करता १५ ऑक्टोबरला मान्सून परततो. मात्र, यंदा तीन-चार दिवस मुक्काम वाढला आहे.

१९ ऑक्टोबरपासून थंडी : १९ ऑक्टोबरपासून हवामान कोरडे झाल्याने पठारी प्रदेशांत थंड वारे वाहू लागतील. उत्तर भारतात तापमानात २-३ अंशाची घसरण होईल. यामुळे थंडी जाणवू लागेल. स्कायमेटचे महेश पालावत यांच्यानुसार, २०-२१ ऑक्टोबरपर्यंत वाऱ्यांची दिशा बदलेल आणि उत्तर-पूर्वेकडून थंड वारे सुरू होतील.

बातम्या आणखी आहेत...