आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Rainy Session Of Parliament Is Possible From September 14, Urging MPs To Test The Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:14 सप्टेंबरपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन शक्य, खासदारांना कोरोना चाचणी करण्याची विनंती करणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकाळ-संध्याकाळ अशा दोन टप्प्यांमध्ये अधिवेशनाचे कामकाज होण्याची शक्यता

संसदीय प्रकरणांंच्या कॅबिनेट समितीने संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हे अधिवेशन एक ऑक्टोबरपर्यंत चालू शकते. सकाळ-संध्याकाळ अशा दोन टप्प्यांमध्ये अधिवेशनाचे कामकाज होण्याची शक्यता आहे. तसेच अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांना कोरोना आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. तर संसदीय कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची, संसदीय स्टाफचीही चाचणी केली जाईल. या प्रकारे कोरोना संसर्गाबाबत या काळात पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी सांगितले, अधिवेशन सुरू होण्याच्या किमान ७२ तासांआधी कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती खासदारांना केली जाईल. खासदारांशिवाय संसदेच्या परिसरात येणारे मंत्रालयातील अधिकारी, पत्रकार आणि लोकसभा व राज्यसभेच्या कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली जाईल. कोरोनाच्या सावटात होणाऱ्या संसद अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात लोकसभा अध्यक्षांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, एम्स, डीआरडीओ व दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.