आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लखनऊ:बसभाड्यापाेटी राजस्थान सरकारने पाठवले 36 लाख‌ रुपयांचे बिल

लखनऊएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • प्रियंका गांधी-वढेरा यांच्या बस वादानंतर राजस्थान सरकारने पाठवले बिल

राजस्थानच्या काेटामधून परतणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या राजस्थान परिवहन मंडळाच्या बसच्या भाड्यापाेटीचा ३६.३६ लाख रुपयांचा भरणा उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी केला. राजस्थान सरकारने हे बिल शुक्रवारी पाठवले हाेते.

उत्तर प्रदेशातील प्रवासी कामगारांना त्यांच्या घरी पाेहोचवण्यासाठी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी याेगी आदित्यनाथ सरकारकडे १,००० बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली हाेती. त्यावरून वाद निर्माण झाला हाेता.

एप्रिलच्या मध्यात उत्तर प्रदेश सरकारने कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी राज्यातील बसेस उपलब्ध करून दिल्या हाेत्या. परंतु विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने राजस्थान परिवहनच्या बसेसची मदत घेण्यात आली हाेती.

कर्नाटक सरकार देणार कामगारांच्या प्रवासाचा खर्च

कामगार विशेष रेल्वेने आपल्या घरी परतणाऱ्या प्रवासी कामगारांचा ३१ मेपर्यंतचा प्रवास खर्च सरकारकडून करण्यात येईल असे कर्नाटकातील भाजपने म्हटले आहे. देशाच्या काेणत्याही राज्यातून येऊन काम करणारे लाेक आमचे आहेत. त्यांची मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे आम्ही मानताे असे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...