आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Rate Of Vaccination Is Slow, With Active Corona Patients Decreasing From 6 Months To Increasing From 10 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना परत येण्याचा ट्रेंड कायम:लसीकरणाचा वेग मंद, 6 महिने घटलेले सक्रिय रुग्ण 10 दिवसांपासून वाढताहेत

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोजचे लसीकरण 7% वाढले, सक्रिय रुग्णांत 8% उसळी

भारतात आता ज्या वेगाने सक्रिय रुग्णांत वाढ होत आहे, त्या वेगाने लसीकरणाचे प्रमाण वाढत नाही आहे. देशात रोज सरासरी ४ लाख लसी टोचल्या जात आहेत. १० दिवसांपूर्वी ही सरासरी ३.७१ लाख होती. म्हणजे, फक्त ७.२०% वाढ झाली आहे. याउलट दुसरीकडे कोरोनाचे सक्रिय रुग्ण १० दिवसांतच १.३७ लाखांवरून १.४९ लाखांवर गेले आहेत. म्हणजेच, त्यात ७.८७% वाढ झाली आहे.

देशात एकूण ३ कोटी हेल्थ-फ्रंटलाइन वर्कर्स आहेत, लसीकरण मात्र १.१७ कोटींचेच झाले आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीअखेरपर्यंत सर्व ३ कोटी कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ते वाढून मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत आणले आहे. तथापि, तेही सध्या आवाक्यात दिसत नाही. कारण, अजून पावणेदाेन कोटी हेल्थ-फ्रंटलाइन वर्कर्सना लसीचा एकही डोस देण्यात आलेल नाही.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, रोज १० हजार रुग्णालयांत लसीकरण होत आहे. यात २ हजार खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. आगामी काळात लसीकरण वेगाने व्हावे म्हणून खासगी रुग्णालयांची संख्या वाढवली जाईल. ५० वर्षांवरील २७ कोटी नागरिकांना लस देण्याची सुरुवात मार्चच्या मध्यापासून करण्याची तयारी आहे. लसीकरण केंद्रांची संख्या १० हजारांवरून ५० हजार केली जाणार आहे.

पंजाब : कर्मचाऱ्यांची चाचणी कधी घेतली, कार्यालये-रेस्तराँत डिस्प्ले होणार
महाराष्ट्रानंतर पंजाबमध्ये निर्बंध लावले जात आहेत. सरकारच्या आदेशानुसार, खासगी कार्यालये आणि रेस्तराँना त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्यांचे विवरण दर्शनी भागात (डिस्प्ले) लावावे लागणार आहे. यात शेवटच्या वेळी त्यांची काेरोना चाचणी कधी झाली, ही माहितीही द्यावी लागेल. जेणेकरून तेथे येणाऱ्या लोक निर्धास्त राहू शकतील. राज्यात सिनेमागृहे १००% प्रेक्षक क्षमतेने उघडण्याचा निर्णय सध्या लांबणीवर टाकण्यात आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात मुंबई-पुण्यानंतर विदर्भातही नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड उसळी पाहावयास मिळते आहे. राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. गरज भासल्यास त्यांना अंशत: लॉकडाउन किंवा रात्रीची संचारबंदी लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

दिलासादायक बाब... आता मृत्यूंची संख्या वाढत नाहीये
भारतात ७ फेब्रुवारीनंतर कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी सातत्याने १०० पेक्षा कमीच आहे. जगभरात कोरोनामुळे दररोज सरसरी ६,५०० मृत्यू होत आहेत. म्हणजे जगातील एकूण मृत्यूंत भारताचा वाटा फक्त १.६% आहे.

बातम्या आणखी आहेत...