आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Real Price Of Petrol Is Still Rs 53.44, Almost The Same As Taxes And Other Expenses.| Marathi News

पेट्रोल व डिझेल केवळ 5% महाग:पेट्रोलचा खरा दर अद्यापही 53.44 रु., जवळपास तेवढाच कर व अन्य खर्च आहे, केंद्र सरकारने कर घटवल्यास दिलासा मिळू शकतो

दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल १ वर्षात फक्त ५% महाग, जगात ५०% पर्यंत वाढ : पुरी
पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, भारतात गेल्या एका वर्षात पेट्रोल व डिझेल केवळ ५% महाग झाले. त्याउलट अमेरिकेत ५१%, कॅनडात ५२%, जर्मनीत ५५%, ब्रिटनमध्ये ५५%, फ्रान्समध्ये ५०% आणि स्पेनमध्ये ५८% पर्यंत दर वाढले आहेत.

दिल्लीत पेट्रोलचा लेखाजोखा
पेट्रोल
मूळ दर53.34
भाडे आदी0.20
डिझेलद्वारे वसूल होणारे दर53.54
(उत्पादन शुल्क आणि व्हॅट वगळून)
उत्पादन शुल्क27.90
डीलर कमिशन (सरासरी)3.83
व्हॅट (डीलर कमिशनवर व्हॅट समाविष्ट)16.54
दिल्लीत किरकोळ विक्री दर101.81

वाहन विक्रेते म्हणाले, इंधन दरवाढही विक्री घटण्यामागचे एक कारण
वाहन विक्रेत्यांची संघटना फाडानुसार, मार्चमध्ये देशातील बाजारपेठेत कारची किरकोळ विक्री मार्च २०२१ च्या तुलनेत ४.८७% कमी आहे. मात्र, ही मार्च २०२० च्या तुलनेत २४.४३% जास्त आहे. गेल्या महिन्यात वाहन विक्रेत्यांनी देशातील बाजारात २,७१,३५८ कार विकल्या. मार्च २०२१ मध्ये त्यांनी २,८५,२४० कार विकल्या होत्या. मार्च २०२० मध्ये हा आकडा २,१८,०७६ होता. फाडानुसार, विक्री घटल्याच्या अनेक कारणांमध्ये पेट्रोल-डिझेलची दरवाढ हेही एक कारण आहे.
पुरवठा साखठी विस्कळीत झाल्याने अडचणी राहू शकतात

फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे वाहन उद्योगासाठी अद्यापही एक आव्हान ठरले आहे. अशात कारच्या डिलिव्हरीसाठी दीर्घावधी लागू शकतो. रशिया-युक्रेन युद्ध व चीनमध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पुरवठ्यावर आणखी परिणाम झाला. यामुळे देशातील बाजारात कारच्या डिलिव्हरीवर परिणाम होईल.

पेट्रोल-डिझेल १५ दिवसांत ९.२० रु./लि. महाग; यापुढे आणखी भाववाढीची शक्यता
देशात मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर ८० पैसे आणखी वाढले. दर १५ दिवसांत १३ व्या वेळेस वाढले आहेत. आतापर्यंत दोन्ही इंधनांचे दर ९.२० रु./लि. वाढले आहेत. औरंगाबादमध्ये २१ मार्च रोजी पेट्रोल १११.६६ व डिझेल ९५.८२ रु./लिटर होते. आता ते अनुक्रमे १२१.३१ आणि १०५.५५ रु./लि. आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत नाहीत. अशा स्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर यापुढे आणखी वाढतील, असे तेल क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...