आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरात आणि हिमाचल प्रदेशात कुणाचे सरकार बनेल, याचे चित्र गुरुवारी मतमोजणीनंतर दुपारी ११ पर्यंत चित्र स्पष्ट होईल. सर्व एक्झिट पोलमध्ये गुजरातेत २७ वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप सरकारवर येईल,असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांची सलग ३३ वर्षे सत्ता होती. गुजरातेत या वेळी भाजप-काँग्रेस-आप अशी लढत तिरंगी दिसून आली आहे. हिमाचलच्या एक्झिट पोलमध्ये काट्याची लढत दिसत आहे. येथे सत्ताबदलाची परंपरा कायम राहिली की नाही याबद्दल राजकीय निरीक्षकांसह तमाम देशात उत्सुकता आहे.
७ एक्झिट पोल मध्ये भाजपला आघाडीचा दावा गुजरात एकूण जागा भाजप काँग्रेस आप 182 117-141 19-51 3-13
हिमाचल एकूण जागा भाजप काँग्रेस आप 68 24-42 24-40 0-1
एक्सप्लेनर कमी मतदान, आदिवासी जागा, आपच्या एंट्रीचा परिणाम होईल? { कमी मतदानाचा परिणाम काय होऊ शकतो? गुजरातेत या वेळी ६४.३३% मतदान झाले. २०१७ च्या तुलनेत हे ५% कमी आहे. मतदानाचा टक्का वाढला की भाजपच्या जागा वाढतात आणि मतदान कमी झाले तर जागा घटतात, हा ट्रेंड १९८० पासून आहे. शहरांत झालेले कमी मतदान आणि आदिवासी पट्ट्यात वाढलेले मतदान कुणाचे गणित बिघडवणार हे आज स्पष्ट होईल. आदिवासी जागांवर काँग्रेसचे आणि शहरी जागांवर भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत या जागांवर विजयाच्या अंतरावर या दोन्ही पक्षांचे लक्ष राहील.
{पाटीदार मतदार किती निर्णायक ठरतील? सौराष्ट्र-कच्छ आणि दक्षिण गुजरातच्या ८९ जागांवर पाटीदार मतदार निर्णायक समजले जातात आणि सौराष्ट्रने दरवेळी धक्कादायक फॉर्म्युला दिला आहे. या वेळीही ३२-३६ जागांवर पाटीदारांचा प्रभाव आहे आणि सौराष्ट्र-कच्छच्या ५४ पैकी १६ जागा अशा होत्या जेथे तिन्ही पक्षांनी पाटीदारांना उमेदवारी दिली होती. पहिल्या टप्प्यात लढत तिरंगी दिसली. कमी मतदानामुळे जय-पराजयाचे अंतर खूप कमी राहू शकते. यामुळे दोन्ही पक्षांवर परिणाम होऊ शकतो.
{महिला मतदार निर्णायक ठरतील? या निवडणुकीत जवळपास सव्वातीन कोटी मतदान झाले आहे. पुरुषांचे ६६.७४% आणि महिलांचे मतदान ६१.७५% झाले. महिला-पुरुषांच्या मतदानातील अंतर ५ टक्के आहे. गेल्या निवडणुकीत हे अंतर ४-४% होते. महिलांचे कमी मतदानही मोठा उलटफेर करू शकते. विश्लेषकांचा अंदाज आणि सर्वेक्षण पाहता असे म्हणता येईल की भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
{दुसऱ्या टप्प्यात सर्वात महत्त्वाचे मुद्दे काय होते? दुसरा टप्पा भाजप विरुद्ध काँग्रेस असा होता. आपची चर्चाच नव्हती. उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातचा इतिहास पाहिल्यास येथे ५४ जागांवर लढत आहे. ३९ जागा अशा आहेत, ज्या १० वर्षांपासून भाजप-काँग्रेसच्या ताब्यात आहे. यापैकी २५ जागांवर भाजपचे तर १४ जागांवर काँग्रसेचे वर्चस्व आहे. तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी याच भागात सर्वाधिक शक्ती पणाला लावली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.