आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:जगातील सर्वात मोठा अणू फ्यूजन प्रकल्पाचा फ्रिज भारतात तयार; वजन 3850 टन, उंची 30 मजली

नवी दिल्ली ( मुकेश कौशिक )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्येही प्रकल्प सुरू, भारताने चीनकडून मिळवले काम

फ्रान्समध्ये दीड लाख कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या अणू फ्यूजन प्रकल्पात भारत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. या प्रकल्पाचे ‘हृदय’ असलेला भाग म्हणजेच ‘क्रायोस्टेट’ (फ्रिज) मंगळवारी सुरतच्या हजिरा येथून फ्रान्सला पाठवला जाईल. यास एलअँडटीने बनवले आहे.

जेव्हा अणुभट्टी जास्त उष्णता निर्माण करते तेव्हा त्याला थंड करण्यासाठी मोठ्या रेफ्रिजरेटरची आवश्यकता असते. याला क्रायोस्टेट म्हणतात. भारताने याचे काम चीनकडून काढून घेतले होते. या प्रकल्पातून १५० दशलक्ष डिग्री सेल्सियस तापमान तयार होईल. जे सूर्याच्या कोरपेक्षा दहापट जास्त असेल. क्रायाेस्टेट वजन ३८५० टन अन् उंची ३० मजले इमारतीएवढी अाहे. याच्या ५० व्या आणि अंतिम भागाचे वजन सुमारे ६५० टन आहे. फ्रान्समधील कादार्शे येथे अणुभट्टी बांधली जात आहे. त्यात हे क्रायाेस्टेट वापरले जाईल.

भारत-अमेरिका, जपानसह ७ देश मिळून बनवत आहेत हे यंत्र

पृथ्वीवर सूक्ष्म सूर्याची निर्मिती करण्याचे काम ७ देशांनी हाती घेतले आहे. यात भारत, अमेरिका, जपान व रशियाचा समावेश आहे. ‘क्रायोस्टेट’ बनवण्याची जबाबदारी भारतावर होती. याच्या खालच्या भागातील सिलिंडर मागील वर्षी जुलैमध्ये तर वरील सिलिंडर मार्चमध्ये पाठवले. आता त्याचे झाकण पाठवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...