आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Relatives Who Came In Search Of The Missing People Said, Now They Are Not Expected To Be Alive, Just The Body Is Recovered So That We Can Perform The Last Rites

उत्तराखंडमधून ग्राउंड रिपोर्ट:बेपत्ता लोकांचे नातेवाईक म्हणाले - 'आता त्यांच्या जिवंत असण्याची आशा नाही, फक्त अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह मिळावा'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तपोवन येथील प्रोजेक्टवरुन 123 लोक बेपत्ता असल्याचा आकडा प्रशासनाने जारी केला आहे.

सचिन चौधरी सलग आठ तास आपल्या भावाचा शोध घेत राहिले. त्यांनी कधी पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. तर कधी भाऊ उत्तराखंडमधील रैनी गावात ज्या कंपनीत कामासाठी आला होता, तेथील लोकांना शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी कधीकधी स्थानिक लोकांना आपल्या भावाचा फोटो दाखवून त्याच्याविषयी चौकशी केली. मात्र एवढे करुनही त्यांना भावाचा शोध लागला नाही.

सचिन यांचा भाऊ विक्की चौधरी हरिद्वारमध्ये नॅशनल इलेक्ट्रिकल्स नावाच्या कंपनीत काम करायचा. तीन दिवसांपूर्वी, त्याच्या कंपनीने दोन लोकांसह उत्तराखंडच्या रैणी गावात असलेल्या ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टमध्ये त्याला मेंटेनेंससाठी पाठवले होते. रविवारी सकाळी रैणीमधील ऋषीगंगामध्ये विद्ध्वंस झाला, तेव्हा हे सर्व लोक ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टमध्ये काम करत होते. त्यानंतर त्यापैकी कोणाचाही पत्ता लागलेला नाही.

सचिन म्हणाले की, 'पोलिस कोणतीच माहिती देत नाहीतेय. कंपनीचे लोकही बेपत्ता झालेल्या लोकांविषयी कोणतीही माहिती देत नाहीये ज्यात मी माझ्या भावाचे नाव शोधेल. लोक सांगत आहेत की, येथे खाली ती कंपनी होती, जिथे माझा भाऊ काम करण्यासाठी आला होता. मात्र येथे तर आता केवळ ढिगारा दिसत आहे. कंपनीचा काहीच पत्ता नाही.' भावाचे वय किती आहे? हे विचारल्यावर सचिन ढसाढसा रडू लागला आणि म्हणाला, 'तो केवळ 25 वर्षांचा होता. अजुन तर त्याचे लग्नही नव्हते झाले'

आपल्या जवळच्या व्यक्तीचा शोध घेत रैणी गावाच्या आजुबाजूला रडत फिरणारे सचिन केवळ एक व्यक्ती नाही. येथे देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेले डजनभर लोक आहेत, ज्या मधील कुणी आपल्या मुलाला शोधत आहेत तर कुणी आपल्या वडिलांचा शोध घेत आहेत. हिमाचलच्या शिमला जिल्ह्यातून आलेले विकास आणि त्याचे साथीदारही आपापल्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी येथे पोहोचले आहेत.

ते सांगतात, 'सरकारने जे हेल्पलाइन नंबर जारी केले होते, पहिले आम्ही त्यावर कॉल केले. ते व्यक्त आहेत किंवा उत्तर देत नाहीत. यानंतर SDRF चा नंबर लागला, मात्र त्यांनी केवळ एवढेच म्हटले की, आम्ही बचाव कार्य करत आहोत आणि कोणतीही ठोस माहिती देणे अद्याप शक्य नाही. कोणतीही सूचना मिळाली नाही तर आम्ही स्वतःच त्यांना शोधण्यासाठी येथे आलो आहोत.'

ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टला सध्या कुंदन ग्रुप नावाची एक कंपनी चालवत होती. या कंपनीचा हिमाचलमध्येही एक प्रोजेक्ट आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीला ऋषिगंगा प्रकल्पाच्या गेटमधून पाणी गळती झाल्याची तक्रार मिळाली होती. ही समस्या दूर करण्यासाठीच कंपनीने आपल्या हिमाचल यूनिटच्या काही कर्मचाऱ्यांना रॅणी यूनिटमध्ये बोलावले होते. रविवारी आपत्ती दरम्यान हे सर्व लोक प्रकल्प साइटवर उपस्थित होते. केवळ चार-पाच दिवसांसाठी रैणीला आलेल्या या लोकांनी आपण परत जाऊ शकणार नाही असा विचारही केला नव्हता.

विकास म्हणाले, 'आमचे लोक खूप शॉर्ट नोटिसवर हिमाचलमधून येथे आले होते कारण कंपनीचे नुकसान होत होते. पण आता एवढी मोठी आपत्ती आल्यावर कंपनीने हे देखील सांगितलेले नाही की, किती लोक बेपत्ता आहेत आणि त्यांची नावे काय आहेत.' आपल्या लोकांना शोधत असताना अनेक लोक कंपनीवरच आरोप लावत आहेत.

मात्र, स्थानिक पोलिस अधिकारी मनोहर सिंह भंडारी म्हणतात की, 'कंपनीकडून कोण उत्तर देईल? जेवढे लोक कंपनीमध्ये होते, त्यामधून कुणीही उत्तर देण्यासाठी जीवंत राहिलेले नाही. त्यांनी कोणतीही सूचना जारी केलेली नाही कारण त्याचे सर्व रिकॉर्ड्स, सर्व कागद, सर्व काही संपले आहे. त्या ठिकाणी एवढा चिखलाचा ढिगारा आहे की, इथे कंपनी, त्यांचे ऑफिस आणि धरण कुठे होते हे कुणीही सांगू शकणार नाही.'

अधिकृत निवेदनानुसार, रैणी गावातून सुमारे चाळीस लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. स्थानिक समाजसेवक अतुल सती म्हणतात, 'बेपत्ता किंवा ठार झालेल्या लोकांची नेमकी संख्या शोधणे फार कठीण आहे. पूर्वी असे सांगितले जात होते की येथून जवळजवळ तीस लोक बेपत्ता आहेत. आता हा आकडा 40 पर्यंत पोहोचला आहे. वास्तविक आकडा यापेक्षा बराच मोठाअसू शकतो. स्थानिक लोकांची यादी तरी तयार आहे कारण ते येथे होते आणि प्रकल्पात काम करायचे, त्यामुळे त्यांचे गायब होणे प्रत्येकाला माहित आहे, परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांची कोणतीही योग्य यादी तयार होणे, ही गोष्ट फार अवघड आहे. '

रैणी येथील ऋषिगंगा प्रोजेक्टवरुन बेपत्ता लोकांची संख्या कळू शकलेली नाही. मात्र तपोवन येथील प्रोजेक्टवरुन 123 लोक बेपत्ता असल्याचा आकडा प्रशासनाने जारी केला आहे. यासोबतच एकूण 26 मृतदेह आणि 5 मानवी अंग सापडले असल्याची सूचना स्थानिक पोलिसांनी जारी केली आहे. जे लोक आपले नातेवाईक जीवंत असल्याची आशा घेत येथे शोधण्यासाठी आले आहेत, त्यांना हे मृतदेह पाहून आपल्या नातेवाईकांना शोधणे ही अत्यंत वेदनादायी प्रक्रिया पार पाडावी लागत आहे.

हिमाचलमधून आलेले विकास म्हणाले की, 'आज पूर्ण दिवसात एकाही व्यक्तीला जीवंत वाचवता येऊ शकलेले नाही. आता अखेरचा पर्याय हाच आहे की, जे मृतदेह मिळत आहेत, आम्ही ते ओळखावे. येथील भयावहर परिस्थिती पाहिल्यानंतर असे वाटतेय की, प्रोजेक्टमध्ये सामिल लोकांच्या जीवंत असण्याची कोणतीही आशा नाही.' आवंठा गिळत तो म्हणतो की, 'आता कमीत कमी मृतदेह मिळावा, जेणेकरुन आम्ही चांगल्या प्रकारे अंत्यसंस्कार करु शकू.'

बातम्या आणखी आहेत...