आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Release Of The Shiva Of Agra, Which Fell Into A 50 foot deep Bore; Shiva, Who Was Trapped At A Depth Of 90 95 Feet, Was Rescued By Soldiers.; News And Live Updates

आग्रा:100 फूट खोल बोअरमध्ये पडलेल्या आग्ऱ्याच्या शिवाची सुटका; 90-95 फूट खोलीवर अडकला होता शिवा, सैनिकांनी वाचवले.

आग्रा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील अाग्रा येथे साेमवारी घरासमाेर खेळत असलेला सहावर्षीय शिवा १०० फूट खाेल बाेअरवेलमध्ये पडला. भारतीय सैनिकांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवण्यात यश अाले. सूत्रांच्या माहितीनुसार साेबत खेळत असलेल्या मुलांनी शिवा बाेअरवेलमध्ये पडल्याची माहिती त्याच्या पालकांना दिली. त्यानंतर त्याचा जीव वाचवण्याची कवायत सुरू झाली.

सैनिकांनी अाॅक्सिजन अाणि खाण्यापिण्याच्या वस्तू दाेरीला बांधून अात पाेहाेचवल्या. ताेपर्यंत सैनिकांची अाणखी कुमक त्यांच्या मदतीला पाेहाेचली. बाेअरवेलमध्ये कॅमेरा व माइक साेडला गेला. बाेअरच्या बाजूने खड्डा खाेदून शिवाची सुटका करण्यात अाली. सैनिकांच्या मते शिवा बाेअरमध्ये ९० ते ९५ फुुटांवर अडकला हाेता.

बातम्या आणखी आहेत...