आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Report Was Negative, Yet The Family Was Not Informed Of The Death In Ratkam, Rajsthan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा कसला प्रोटोकॉल ?:रिपोर्ट निगेटिव्ह होता, तरीदेखील कुटुंबाला मृत्यूची माहिती दिली नाही; चितेत टाकले पीपीई किट आणि ग्लव्ज

रतलाम9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंत्यविधीदरम्यान चितेत पीपीई किट टाकताना कर्मचारी - Divya Marathi
अंत्यविधीदरम्यान चितेत पीपीई किट टाकताना कर्मचारी
  • आईच्या तब्येतीची माहिती जाणून घेण्यासाठी हॉस्पीटलमध्ये फोन लावल्यावर उडवा-उडवीची उत्तरे मिळायची
  • नोडल ऑफिसर म्हणाले- रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरही प्राटोकॉल अंतर्गत अंत्यविधी केला जातो

मध्य प्रदेशच्या रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये जावराच्या महिलेचा बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने याची माहितीदेखील कुटुंबाला दिली नाही. मृत महिलेचा रिपोर्ट दोनवेळा निगेटिव्ह आला होता. तरीदेखील नगरपालिकेने कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत रतलाममध्ये अंत्यविधी केला. कुटुंबियांचा आरोप आहे की, त्यांना आईच्या मृत्यूची माहिती हॉस्पीटलने दिली नाही. कुटुंबीय सकाळी 8 वाजता स्मशानभूमित पोहचले, तिथे 5 तासानंतर मृतदेह आणण्यात आला. महिलेच्या मुलाचा आरोप आहे की, मृतदेह घेऊन आलेल्या लोकांनी त्यांचे पीपीई किट आणि ग्लव्जदेखील चितेत टाकले.

जावराचे रहिवासी राकेशने सांगितले की, त्यांची आई शांतिबाई लॉकडाउनपूर्वी बहिणीला भेटायला राजस्थानच्या प्रतापगडला गेली होती. त्या 12 मे रोजी घरी परत आल्या. तेव्हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारेंटाइन करण्यात आले. राकेशने सांगितले की, आईची रिपोर्ट निगेटिव्ह आली होती, पण काही दिवसानंतर ताप आल्यामुळे आईला घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना कोरोना संशयित समजून रतलाम रेफर केले. 5 दिवसांपूर्वी रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती केल्यानंतर दुसऱ्यांना 10 जूनला केलेली चाचणीदेखील निगेटिव्ह आली.

भेटून देत नव्हते आणि तब्येतीची माहिती देत नव्हते

राकेशचा आरोप आहे की, हॉस्पीटलमध्ये त्यांना आईला भेटू दिले जात नव्हते. तेथील लँडलाइन नंबरवर फोन केल्यावर कोणीच योग्य माहिती देत नव्हते. आईच्या मृत्यूची बातमीदेखील नातेवाइकांकडून मिळाली. फोन केल्यावर म्हणाले, मृत्यू झाला आहे, सकाळी 9 वाजता रतलामच्या स्मशानभूमित या. आम्ही सकाळी 8 वाजताच स्मशानभूमित पोहचलो.

आईचा चेहरा पाहू दिला नाही

राकेशने पुढे सांगितले की, पाच तासानंतर दुपारी 1 वजात कर्मचारी पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला मृतदेह घेऊन आले. आम्ही सर्वजण विनंती करत होतो की, चेहरा दाखवा, पण त्यांनी दाखवला नाही. शेवटी मोठा भाऊ गोपाल मालीच्या हाताने मुखाग्नि देऊन अंत्यिविधी करण्यात आला.

प्रोटोकॉल अंतर्गत केला अंत्यविधी: नोडल अधिकारी

जिल्ह्यातील कोव्हिड-19 चे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद प्रजापतीने याबाबत सांगितले की, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही प्रोटोकॉल अंतर्गत अंत्यविधी केला जातो. सुरक्षेखातर असे केलेजाते. शासनाच्या नियमानुसार जिथे मृत्यू होतो, तिथेच अंत्यविधी केला जातो.

बातम्या आणखी आहेत...