आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Richest Temple In Financial Crisis, Tirupati Temple Will Auction 23 Properties

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक संकट:सर्वात श्रीमंत मंदिर आर्थिक संकटात, तिरुपती मंदिर दानातील 23 मालमत्तांचा लिलाव करणार

तिरुपतीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मंदिराला दैनंदिन खर्चाशिवाय सुरक्षा, अस्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सुमारे 125 काेटींची गरज

काेराेनामुळे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपती देवस्थानदेखील संकटात सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाने भक्तांकडून दानरूपात मिळालेल्या २३ मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व संपत्ती तामिळनाडूत आहे. या संपत्तीत तामिळनाडूतील विविध जिल्ह्यांत असलेली स्थावर तसेच शेतजमिनीचाही समावेश आहे. त्यांची किंमत १.५० काेटी रुपये ठेवण्यात आली आहे. व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार दैनंदिन खर्चाशिवाय सुरक्षा, अस्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सुमारे १२५ काेटी रुपयांची गरज भासणार आहे. सुमारे दाेन महिन्यांपासून लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मंदिराच्या हुंडीमधून हाेणारे ४०० काेटी रुपयांचे उत्पन्न आता खंडित झाले आहे. मंदिराच्या उत्पन्नाचा हा महत्त्वाचा स्रोत मानला जाताे. भक्तांकडून मंदिराला दानरूपात हुंडी मिळते. मात्र आता मंदिर समितीसमाेर कर्मचाऱ्यांचे वेतन, दैनंदिन खर्च भागवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. वास्तविक मंदिराकडे ९ टन साेने १४ हजार काेटी रुपयांचा एफडी आहे. परंतु समिती त्याचा वापर करू इच्छित नाही. एफडीवर सुमारे ७०६ काेटी रुपये व्याज मिळणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...