आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तब्बल २ लाख कोटींची मालमत्ता असलेल्या केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिर प्रशासनावर त्रावणकोर राजघराण्याचाच अधिकार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. केरळ हायकोर्टाचा निकाल फिरवत न्या. यू. यू. ललित व इंदू मल्होत्रा यांच्या पीठाने सोमवारी निकालात मंदिर व्यवस्थापनावर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवला. कोर्टाने मंदिरातील बंद तळघर उघडण्याचा निर्णय व्यवस्थापनावरच सोपवला. हायकोर्टाने २०११ मध्ये म्हटले हाेते की, १९९१ मध्ये त्रावणकोरच्या शेवटच्या राजाच्या मृत्यूनंतर राजघराण्याचा अधिकार संपला. कोर्टाने सरकारला पद्मनाभस्वामी मंदिर, मालमत्ता व व्यवस्थापन हाती घेण्याचा आदेश दिला होता.
तळघराचे रहस्य कायम
केरळ हायकोर्टाने सर्व तळघरे उघडण्याचा आदेश दिला होता. मात्र, मेहराब बी हे तळघर उघडले तर विनाश होईल, असे राजघराण्याने म्हटले होते. ६ पैकी ५ तळघरांत सोने आणि बहुमूल्य वस्तूंचा खजिना निघाला. तेव्हा त्याचे मूल्य ९० हजार कोटी होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.