आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीश यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद:सरकार आल्यावर दंगेखोरांची गय केली जाणार नाही : शहा

नवादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राम नवमीनंतर बिहारच्या काही भागात हिंसाचार आणि तणाव आहे. बिहारशरीफ आणि सासाराममध्ये जमावबंदी आदेश लागू केला आहे. बिहारशरीफमध्ये गोळी लागल्याने शनिवारी तीन जण जखमी झाले. हिंसाचारामुळे सासारामचा दौरा रद्द केलेल्या शहा यांनी रविवारी राज्यातील नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये एका सभेत नितीश सरकारवर जातीय हिंसाचार रोखण्यात अपयशी राहिल्याबद्दल निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, २०२५ मध्ये भाजपच्या सरकार आल्यावर दंगेखोरांना उलटे लटकावले जाईल.

ते म्हणाले, नितीशकुमार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंग पावेल आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे कामकाज सोपवण्याचे आपले आश्वासनही पूर्ण करू शकणार नाहीत. त्यांनी लालुप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यावर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप लावला. यामुळे दहशतवाद पसवरण्यासाठी मदत केली. गृहमंत्र्यांनी सांगितले की, भाजप आता कधी नितीश यांच्यासोबत येऊ शकत नाहीत. भाजपचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी हिंसाचाराच्या घटनेमागे बाहेरचे तत्त्व असू शकते,अशी शंका व्यक्त केली आहे.

शहांची राज्यपालांशी चर्चा; १० तुकड्या तैनात शहा यांनी तणावपूर्ण स्थितीबाबत बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याशी चर्चा केली. बिहार शरीफ व सासारामध्ये केंद्रीय दलाच्या १० तुकड्या पाठवल्या आहेत. प. बंगालमध्ये पुन्हा तणाव प. बंगालमध्ये हुबळीच्या शोभायात्रेत हिंसाचार झाला. भाजपने आयोजित केलेल्या यात्रेत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष सहभागी होते.