आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajpath Name Change |ndmc Approves Changing Of Name Rajpath To Kartavya Path | Marathi News

राजधानीतील राजपथ आता कर्तव्यपथ:राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या रस्त्याचे नाव बदलण्यात आले

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजपथ यापुढे 'कर्तव्यपथ' या नवीन नावाने ओळखला जाईल. NDMC च्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत तमाम देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. त्या म्हणाल्या, राजपथचे नामांतर करण्याच्या निर्णयामुळे मातृभूमीची सेवा करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी होत आहे.

राजपथ हा राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंतचा रस्ता असून याची लांबी 3 किलोमीटर आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी परेड राजपथावरच होते. केंद्र सरकारने अलीकडेच त्याचे नाव बदलून कर्तव्यपथ ठेवण्याचा निर्णय घेतला. याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्ली महानगरपालिकेने (NDMC) आज बैठक बोलावली होती. सभेत नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवन आणि परिसर कर्तव्यपथ' म्हणून ओळखला जाणार आहे.

पंतप्रधान करणार सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूचे उद्घाटन
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतचा सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू पूर्ण झाला आहे. 8 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे उद्घाटन करणार आहेत. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या राजपथाच्या दोन्ही बाजूच्या भागाला सेंट्रल व्हिस्टा म्हणतात. आता राजपथचे नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...