आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदामाचे छत कोसळले:भिवंडी येथील गोदामाचे छत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, 7 जण जखमी; 23 जण सुखरूप बचावले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत कोसळताना एकूण 31 जण त्या इमारतीमध्ये होते

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका गोदामाचे छत कोसळले आहे. मनकोलीच्या हरिहर कंपाउंडमध्ये सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, मनकोली नाकाजवळ ही एक मजली इमारत होती. त्याचा गोडाउन म्हणून वापर केला जात होता. तसेच सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. यात एका सुरक्षा रक्षकाचा ढिगाराखाली दबून मृत्यू झाला.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मजली गोडाऊनमध्ये एकूणच 31 जण होते. त्याच दरम्यान छत कोसळले. 31 जणांपैकी 23 जण कसेबसे तेथून सुखरूप बचावले. तर एका सुरक्षा रक्षकाचा त्यात मृत्यू झाला.

मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव सौरभ त्रिपाठी असे होते. यानंतर 7 जण ढिगाराखाली दाबल्या गेले होते. त्यांनाही बाहेर काढण्यात आले. ते सगळेच जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...