आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The School college Will Be Open After August 15, Before Which The Results Will Be Announced

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तयारी:शाळा-कॉलेज 15 ऑगस्टनंतर उघडणे शक्य, त्याआधी निकाल घाेषित होणार - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुलैमध्ये बाेर्डाचे राहिलेले इतर पेपरही घेतले जातील, ऑनलाइन परीक्षाही शक्य

देशातील शाळा व महाविद्यालये आॅगस्ट २०२० नंतर पुन्हा उघडतील. शक्यतो १५ ऑगस्टनंतर शैक्षणिक संस्थाही उघडतील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीत पोखरियाल म्हणाले, १५ आॅगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतरच शाळा उघडल्या जातील. मार्चमध्ये लाॅकडाऊन लागू झाल्यापासून शाळा-काॅलेज बंद केलेले आहेत. तसेच परीक्षाही लांबणीवर टाकल्या होत्या. बाेर्डाचे उरलेले पेपर आणि परीक्षा जुलैत घेतल्या जातील. सर्व निकाल पुढील महिन्यात जाहीर होतील.

पोखरियाल म्हणाले, कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रुग्णांची वाढती आकडेवारी पाहून देशभरातील पालकांत शाळा उघडण्याची चिंता आहे. सीबीएसईने दहावी व बारावीचे उरलेले पेपर विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत देण्याची मुभा दिली आहे. कोरोनाची उच्चांकी पातळी जुलैत येणार असल्याच्या अंदाजाबाबत पोखरियाल म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशांचे पालन करू.

सूत्रांनुसार, शाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभी ३३ वा ५०% विद्यार्थ्यांना बोलावले जाऊ शकते. तथापि, शेवटचा निर्णय घेण्याचा अधिकार शाळा प्रशासन व राज्य शिक्षण विभागाकडे असेल. ते आपली साधने व क्षमतेनुसार निर्णय घेऊ शकतात. विद्यार्थी व कॉलेज कर्मचाऱ्यांनाही डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनच्या नियमांचे पालन करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...