आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The School Which Was Blown Up By A Notorious Naxalist, His Daughter in law Is Making The Lives Of Many Students As A Teacher.

विशेष:कुख्यात नक्षलवाद्याने जी शाळा उडवली होती, तेथेच त्याची सून शिक्षिका होऊन घडवत आहे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य

मुरली दीक्षित, धीरज सिंह. जमुई/बरहट (बिहार)23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हीे कथा आहे स्थित्यंतराची... भीमबांध जंगलातील सर्वात जास्त नक्षलप्रभावित गाव होते चोरमारा. कुख्यात नक्षलवादी बालेश्वर याची येथे मोठी दहशत होती. गेल्या काही वर्षांत सतत होणारे स्फोट आणि गोळीबारांच्या दहशतीतून हे क्षेत्र आता बाहेर पडले आहे. महिला काम करून सन्मानपूर्वक आयुष्य जगत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर आता आधीसारखी भीती दिसत नाही. त्यांच्या डोळ्यात आता स्वप्न दिसतात. कुख्यात बालेश्वर आणि अर्जुन कोडा यांची दहशत अशी होती की, सुरक्षा दलांनाही सांभाळून पाऊल ठेवावे लागत होते.

गेल्या दोन महिन्यांत सर्व काही बदलले आहे. १३ जून रोजी नक्षली बालेश्वर, अर्जुन आणि नागरेश्वरने आत्मसमर्पण केले. यामुळे भीमबांधमध्ये नक्षलीवादी संघटनेचे कंबरडे मोडले. या गावापासून काही अंतरावर मुंगेरचे तत्कालीन एसपी के.सी. सुरेंद्र बाबूंची हत्या नक्षलींनी केली होती. बालेश्वरची पत्नी मंगनी देवी आता गो पालन करते. सीआरपीएफने एका योजनेअंतर्गत मंगनीला गाय दिली आहे. ती दूध विकून खर्च भागवते. सून रंजू देवी प्राथमिक शाळा चोरमारात शिकवत आहे. २००७ मध्ये तिचे सासरे बालेश्वरने ही शाळा स्फोटाद्वारे उडवली होती.

मुलांच्या भविष्याची शाश्वती दिल्यावर तिघांना आत्मसमर्पणासाठी तयार केले मंगनीदेवीला पतीचा शोध घेण्यासाठी तब्बल चार महिने लागले. मंगनीने सांगितले की, दररोज ती चोरमारा, गुरमाहाच्या जंगलात बालेश्वरला भेटण्यासाठी अनेक तास पायपीट करत होती. ती पतीला मुख्य प्रवाहात परत आणू इच्छित होती. संघटनेच्या लोकांना माहीत झाले असते तर परिणाम वाईट झाले असते याची जाणीव होती. मात्र, जिद्दीमुळे या टप्प्यापर्यंत पाेहोचले. पतीला भेटल्यानंतर तिने मुलांच्या भविष्याची शाश्वती दिली.यातूनच बदल सुरू झाला. मंगनीने चोरमारा कॅम्पमध्ये सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांशी बोलून बालेश्वरसह तिघांना आत्मसमर्पणासाठी तयार केले.

बातम्या आणखी आहेत...