आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी सरकारचा विस्तार:28 किंवा 29 मे रोजी होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, मध्यप्रदेशातील सर्व कार्यक्रम रद्द करून राज्यपाल आनंदीबेन अचानक लखनऊला पोहोचल्या

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारच्या दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू झाली आहे. मध्यप्रदेशचे सर्व कार्यक्रम रद्द करून राज्यपाल आनंदीबेन पटेल अचानक लखनऊला पोहोचल्या. राजभवनातही तयारी सुरू आहे, यामुळे 28 ते 29 मे दरम्यान योगी सरकारच्या दुसर्‍या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी IAS एके शर्मा उपमुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित आहे. यासोबतच केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे उत्तर प्रदेश भाजपाची कमान सोपवून OBC चेहऱ्यासोबत भाजप निवडणुकीत उतरू शकतो.

दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल
19 मार्च 2017 रोजी योगी सरकारची स्थापना झाल्यानंतर 22 ऑगस्ट 2019 रोजी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला होता. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात 56 सदस्य होते. कोरोनामुळे तीन मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री विजय कुमार कश्यप यांचा मृत्यू झाला, तर मंत्री चेतन चौहान आणि मंत्री कमल राणी वरुण यांचा पहिल्या लाटेत मृत्यू झाला आहे.

यूपीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या 60 पर्यंत असू शकते. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 6 स्वतंत्र प्रभारी मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. यात तीन नवीन चेहरे देखील होते.

ही आहे यूपीच्या मंत्रिमंडळाची संख्या
उत्तर प्रदेश सरकारमध्ये जास्तीत जास्त 60 मंत्री होऊ शकतात. योगी सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या 23 कॅबिनेट मंत्री, 9 स्वतंत्र प्रभारी मंत्री आणि 22 राज्यमंत्री आहेत, म्हणजे एकूण 54 मंत्री आहेत. त्यानुसार 6 मंत्रीपदे अद्याप रिक्त आहेत. अशा परिस्थितीत योगी सरकारने आपल्या मंत्रिमंडळातून कोणत्याही मंत्र्याला हटवले नाही तरी 6 नवीन मंत्र्यांची नेमणूक होऊ शकते. हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे मंत्रिमंडळात काही नवीन लोकांचा समावेश करून योगी सरकार राज्याच्या राजकीय समीकरणावर लक्ष केंद्रित करू शकते.

कोरोना साथीच्या व्यवस्थेतील अपयशामुळे आणि पंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांविषयी भाजपची चिंता वाढली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ आठ महिने शिल्लक आहेत.

बातम्या आणखी आहेत...