आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Second Corona Wave Caused Census Campaign, The First Phase Of The Process Could Not Begin

जनगणना:दुसऱ्या कोरोना लाटेमुळे जनगणना मोहिमेवर पाणी, पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही

नवी दिल्ली(मुकेश कौशिक)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंत घरांची यादी आणि घरांची मोजणी होईल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशव्यापी जनगणनेअंतर्गत या महिन्यापासून घरांची यादी तयार करण्याची योजना थंड बस्त्यात गेली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल २ मे रोजी आल्यानंतर ५ मेपासून पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा विचार होता, पण सुमारे ३० लाख जनगणना कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणापासून ते घरांच्या यादीपर्यंतची प्रारंभिक कार्यवाही सुरू होऊ शकली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

याआधी जनगणना महानोंदणीकार विवेक जोशी यांनी १५ एप्रिलला डेटा कॅप्चरिंग सेंटरचे उद्घाटन केले होते. हे आयोजनही व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारेच होऊ शकले. पण त्यानंतर कार्यालय जवळपास बंदच आहे. सूत्रांनुसार की, या वर्षासाठी आराखडा नाही त्यामुळे जनगणना २०२२ पासूनच सुरू होऊ शकेल. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदपुस्तक अपडेट करण्याचे कामही तेव्हाच होईल. जनगणनेचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. त्यासाठी ८,७५४ कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी ३,९४१ कोटी रुपये लोकसंख्या नोंदपुस्तक अपडेट करण्याच्या कामावर खर्च होतील. आता पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंत घरांची यादी आणि घरांची मोजणी होईल.

कोरोनाने २०२० ते २०२२ पर्यंत लोकसंख्येला कशा प्रकारे प्रभावित केले हेही जनगणनेमुळे ठोसपणे समोर येईल. किती मृत्यू सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदले गेले किंवा कितीची नोंद नाही, हेही समोर येईल.

पहिली डिजिटल जनगणना
२०२२ ची जनगणना पहिली डिजिटल जनगणना ठरेल. त्यासाठी मोबाइल अॅप आणि वेब अॅप्लिकेशन्स तयार झाले आहेत. अॅप १६ भाषांत आहे. मोबाइल अॅप्लिकेशन्समध्ये खालच्या स्तरावरच्या लोकसंख्या ब्लॉकच्या जिओ टॅगिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एनपीआर, हाऊस लिस्टिंग आणि लोकसंख्येसाठी स्वत:च डेटा अपलोड करण्याचीही व्यवस्था आहे. पण ३० लाख जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन त्याची पडताळणी करतील.

बातम्या आणखी आहेत...