आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळांना जबाबदारी:71 दिवसांनंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला नाही दुसरा डोस, आता शिक्षक ऑनलाइन देतील धडा

सुरत23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीईओंनी दिले आदेश- लस घेण्याबाबत पालकांना सांगा

आॅनलाइन शिकवताना शिक्षक आता पालकांना लसीचा धडा शिकवतील. राज्य सरकार लस घेण्यासाठी लोकांना प्रेरणा देत आहेत. तरीही लोक अपेक्षेनुसार लस घेताना दिसत नाहीत. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी आता महानगरपालिका शाळांची मदत घेत आहे. मनपाने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून लस टोचण्याचे संदेश देण्याचे सांगितले आहे. शाळांच्या माध्यमातून लस टोचून घेण्याचा संदेश पालकांना द्यावा, असे मनपाने त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना पाठवलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. तो नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लस टोचून घेण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे. यासाठी आॅनलाइन वर्गादरम्यान त्याबाबत प्रचार- प्रसार केला जाईल. यासाठी ऑनलाइन शिकवताना शिक्षक काही वेळ काढून पालकांना लस टोचून घेण्याबाबत सांगतील.

लसीकरण : २५४७१ फ्रंटलाइन वर्करपैकी १६२६५नी घेतला दुसरा डोस
सुरतमध्ये ३८ हजार ८१४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे. यातील २३ हजार ५७७ आरोग्य कर्मचाऱ्यांनीच दुसरा डोस घेतला आहे. याचे प्रमाण ६०.७१ टक्के आहे. तर २५ हजार ४७१ फ्रंट लाइन वर्करनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यातील १६ हजार २६५ फ्रंटलाइन वर्करनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण ६३.८५ टक्के आहे. १ लाख २७ हजार ४६१ वरिष्ठ नागरिकांनी पहिला डोस घेतला. पहिला डोस घेणाऱ्या ४५ ते ५९ वर्षांचे व सहव्याधी असलेल्यांची संख्या ३६ हजार २९१ आहे.

७५.८५% लसी सरकारी केंद्रावर | लस घेण्यासाठी सर्वाधिक लोक सरकारी केंद्रांवर जात आहेत. आतापर्यंत १५७९३२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. यातील १.१९ लाख जणांनी सरकारी केंद्रांवर लस घेतली. तर ३८१४१ जणांनी खासगी केंद्रांवर लस टाेचून घेतली.

कमी होतेय संख्या | १५ फेब्रुवारीला ९७८ लोकांनी पहिला डोस घेतला होता. २२ फेब्रुवारीला २००२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला होता. २५ फेब्रुवारीला सर्वाधिक ३५४५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आणि २१ मार्चला १६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला.

ऑनलाइन शिकवताना पालकांशी संवाद
दोन डोस घेणारे २.६७ लाख | २६७८७९ जणांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. यातील सर्वाधिक पहिला डोस घेणाऱ्या ज्येष्ठांची संख्या १ लाख २७ हजार ४६१ आहे. पहिला डोस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ३८ हजार ८१४ आहे.

बातम्या आणखी आहेत...