आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा सराव (ड्राय रन) शुक्रवारी घेतला जात आहे. देशात कोरोना लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत गुरुवारी केंद्राने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘राज्यांनी आपली सज्जता ठेवावी. लसीची पहिली खेप लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, केंद्रशासित प्रदेशासंह १९ राज्यांना पुरवठादारांच्या माध्यमातून तर इतर १८ राज्यांना सरकारी मेडिकल स्टोअर डेपोतून कोरोना लस मिळेल. लसीच्या वाहतुकीसाठी भारतीय वायुदल आणि व्यावसायिक विमान कंपन्यांच्या विमानांचा वापर केला जाईल. सरकारने लसीच्या वाहतुकीसाठी देशात अनेक मिनी हब उभारले आहेत. सूत्रांनी सांगितले, “देशभरात एकूण ४१ विमानतळांवर लसीच्या डिलिव्हरीला अंतिम रूप देण्यात आले आहे.’ याबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सर्व राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला.
महाराष्ट्र : ३० जिल्हे, २५ मनपांत ड्राय रन
मुंबई | शुक्रवारी महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांत कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात ३ आरोग्य संस्था व प्रत्येक मनपात एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारीच दिली होती. त्यानुसार, शुक्रवारी त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
या राज्यांना थेट पुरवठादारांकडून लस
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश, प.बंगाल.
देशभरात आज लसीकरणाचा दुसरा सराव
अचूक वितरण व लसीकरणाची सज्जता जोखण्यासाठी शुक्रवार व शनिवारी देशभरातील ७०० जिल्ह्यांत दुसरी रंगीत तालीम घेतली जात आहे. आधीच्या सरावातील त्रुटी लक्षात घेऊन या वेळी त्यात योग्य त्या सुधारणा केल्या जातील. यापूर्वी 2 जानेवारी रोजी लसीकरणाचा पहिला सराव घेण्यात आला होता.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.