आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Second Wave In India Increased The Crisis For The World, The Government's Laxity And Wrong Decisions Worsened The Situation.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढण्यात सरकारची रणनीती अपयशी:भारतातील दुसर्‍या लाटेने जगासाठी संकट वाढवले, सरकारचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या निर्णयांनी परिस्थिती अधिकच बिघडली

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साथीच्या रोगाची दुसरी भयावह लाट केवळ भारतच नाही तर जगासाठीही विनाशकारी ठरू शकते.

भारतात 14 एप्रिल हा दिवस खूप महत्त्वपूर्ण होता. हिंदूंनी आणि शिखांनी नववर्षाचे स्वागत केले. मोठ्या संख्येत मुसलमान रमजानच्या पहिल्या दिवसाचा रोजा सोडण्याची तयारी करत होते. हरिद्वार कुंभ मेळ्यात लाखो लोकांनी गंगा नदीमध्ये डुबकी लावली. दुसरीकडे देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा जास्त नोंदवण्यात आली. त्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची मोकळीक आणि हलगर्जीपणामुळे दुसरी लाट ही अनियंत्रित झाली आहे. सरकार गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधणे घालण्यात अपयशी ठरली. लस खरेदी करणे आणि व्हायरसच्या रिसर्चसाठी पैसे देण्याचे निर्णय उशीरा आले.

साथीच्या रोगाची दुसरी भयावह लाट केवळ भारतच नाही तर जगासाठीही विनाशकारी ठरू शकते. विषाणूच्या अनियंत्रित प्रसारामुळे धोकादायक नवीन स्ट्रेन उद्भवण्याचा धोका वाढत आहे. भारतात पहिल्यांदाच यूएस, ब्रिटनसह इतरही अनेक देशांमध्ये डबल म्युटंट ओळखल्या जाणार्‍या व्हायरसचा नवीन प्रकार आढळला आहे. भारताच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम जगाच्या इतर भागात लसींच्या पुरवठ्यावर झाला आहे. संक्रमण वाढल्यावर सरकारने व्हॅक्सीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

गर्दीची शहरे आणि आरोग्य सेवा कमकुवत झाल्यामुळे भारतात कोणत्याही संक्रमक आजारावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. तरीही, सप्टेंबर 2020 मध्ये पहिल्या शिखरावर पोहोचलेल्या लाटेत मृत्यूची संख्या आश्चर्यकारकपणे कमी होती. इतर सरकारांप्रमाणे यावर्षापर्यंत महामारीचा सामना करण्यात भारत सरकारचा रेकॉर्ड खराब नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुर्लक्ष आणि आत्मसंतुष्टतेमुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली. जानेवारीत मोदींनी अशी बढाई मारली की आम्ही केवळ आपल्या समस्या सोडवल्या नाहीत तर साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी जगाला मदत केली आहे. दुसरीकडे, मार्चच्या सुरूवातीला जेव्हा विरोधी शासित महाराष्ट्रात कोरोना प्रकरणे वाढू लागले तेव्हा मोदी सरकारने मदत करण्याऐवजी राज्य सरकार पाडण्याचा विचार करुन त्यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली.

या महिन्यात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय फायदा मिळवण्यासाठी मोदींनी सुरू ठेवलेल्या प्रचाराची झलक दिसली. त्यांनी, त्यांचे नेते आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बऱ्याच मोठ्या सभा घेतल्या. यामध्ये मास्क घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे अजिबात पालन करण्यात आले नाही. यामध्ये राज्यातील दहा कोटी लोकांमध्ये महामारी पसरण्याचा धोका तर आहोच. मात्र राजकारणामुळे सरकारचे लक्ष आजारावर नव्हतेच.

मोदींचा उजवा हात गृहमंत्री अमित शहा एप्रिलच्या पहिल्या 18 दिवसांपैकी 12 दिवस प्रचारात व्यस्त होते. यावरुन मोदींचे लस धोरण कसे गोंधळलेले आहे हे समजून घेण्यात मदत होऊ शकते. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सरकारने केवळ 3% लोकसंख्येच्या लोकांसाठी डोसचे आदेश दिले होते. सरकारी नियामक एजेंसीने स्वदेशी व्हॅक्सीन-कोव्हॅक्सीनला सर्वत आवश्यक ट्रायल न करताच मंजूरी दिली होती. दुसरीकडे परदेशी लसींसाठी अतिरिक्त अडथळे निर्माण करण्यात आले.

दरम्यान, सरकारच्या निर्णयांमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. सरकारने लसींच्या वेगाने होणारी आयातीला हिरवा झेंडा दाखवला आहे. उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने सीरम संस्थेला तीन हजार कोटी रुपये दिले आहेत. भारतीय जनता पक्षाने बंगालमधील प्रमुख निवडणुका रॅली रद्द केल्या आहेत. पुढील महिन्यापासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील बर्‍याच भागात लसांचा अभाव पाहता या निर्णयाचा मर्यादित फायदा होईल.

बातम्या आणखी आहेत...