आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Second Wave Of Corona Is Still Raging In The Country, With Festivals Likely To Escalate In September October.

लसीकरण गॅपचा रिव्ह्यू:कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर तिसऱ्यांदा बदलले जाऊ शकते, सध्या 84 दिवसांच्या अंतराने दिली जात आहे लस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत विचार

केरळमधून येणाऱ्या कोरोना संसर्गाची आकडेवारी भयावह आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशभरात कोरोना कमजोर होत आहे, परंतु केरळ सरकारची चिंता वाढवत आहे. गेल्या 24 तासांत देशात 46 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यातील 58% फक्त केरळमधील आहेत. उर्वरित राज्यांमध्ये अजूनही घसरणीचा कल दिसून येत आहे. आपण अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आहोत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने अनेक सणांमुळे खूप महत्वाचे आहेत.

त्यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांमध्ये देशात 80 लाख डोस लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी 4 पर्यंत 47 लाखांहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. कोरोना लस हा रोगाचा धोका कमी करेल, तो रोखणार नाही, म्हणून लसीकरणानंतरही मास्क वापरणे फार महत्वाचे आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या देशातील 41 जिल्ह्यांमध्ये 10% पेक्षा जास्त आहे.

कोवीशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत विचार
दरम्यान, सरकारी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की कोव्हशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार केला जात आहे. लसीकरणावर बनवलेल्या तांत्रिक अ‍ॅडवायजरी ग्रुप NTAGI मध्ये यावर चर्चा केली जाईल. असे झाल्यास, दोन डोसमधील गॅप तिसऱ्यांदा बदलला जाईल. सध्या हे अंतर 84 दिवसांचे आहे. देशात लसीकरणाच्या सुरुवातीला कोवीशील्डचे दोन्ही डोस 4-6 आठवड्यांच्या अंतरावर लावले जात होती. नंतर हे वाढवून 6-8 आठवडे करण्यात आले होते.

इतकी प्रकरणे 56 दिवसांनंतर आली
देशात 46,280 नवीन कोरोना रुग्ण आढळले. 56 दिवसांतील हे सर्वाधिक आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी 46,781 प्रकरणे होती. गेल्या 24 तासांत 34,242 संक्रमित लोक बरे झाले आणि 605 जणांचा मृत्यू झाला. केरळमधील परिस्थिती पुन्हा गंभीर दिसत आहे. बुधवारी येथे 31,445 बाधित आढळले आणि 20,271 बरे झाले. या दरम्यान, या साथीमुळे 215 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 19.03%पर्यंत वाढला आहे.

देशातील कोरोना महामारी आकड्यांमध्ये
गेल्या 24 तासात एकूण नवीन केस आल्या : 46,265
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 34,242
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :605
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.25 कोटी
आतापर्यंत बरे झाले :3.17 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.36 लाख
सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :3.27 लाख

बातम्या आणखी आहेत...