आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलमध्ये मोदींची काँग्रेसवर सडकून टीका:म्हणाले, संरक्षण करारात मोठ्या प्रमाणात दलाली केली, हजारो कोटींचे घोटाळे केले

सोलन/मंडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी हिमाचल प्रदेशातील मंडी आणि सोलनमध्ये निवडणूक प्रचार सभेला संबोधित केले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, जे स्वत:ला अत्यंत प्रामाणिक म्हणतात तेच सर्वाधिक भ्रष्ट असतात. ते म्हणाले, संरक्षण उपकरणांच्या बाबतीत देश स्वावलंबी व्हावा असे काँग्रेसला कधीच वाटले नाही. लष्कराच्या प्रत्येक खरेदीत त्यांना कमिशन हवे होते. स्वातंत्र्यानंतर देशातील पहिला घोटाळा काँग्रेसने संरक्षण क्षेत्रात केला. त्यांनी संरक्षण करारात मोठ्या प्रमाणात दलाली केली, हजारो कोटींचे घोटाळे केले.

काँग्रेसच्या राज्यात भारत स्थिर राहू नये, भारतात स्थिर सरकार येऊ नये असे स्वार्थी घटक व गट काँग्रेसमध्ये निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केला. केंद्रात स्थिर सरकार बनले तेव्हा भ्रष्टाचार व भ्रष्टाचाऱ्यांविरोधात निर्णायक लढा सुरू झाला. हिमाचलला भाजप स्थिर सरकार देऊ शकतो. स्थिर सरकारमध्ये विकास वेगाने होतो.

राधास्वामी सत्संग डेरा प्रमुखांची घेतली भेट
पंतप्रधान मोदी अमृतसर येथील राधास्वामी व्यासमध्ये गेले व तिथे डेराप्रमुख बाबा गुरिंदरसिंह ढिल्लन यांची भेट घेतली. डेरा व्यासचा पंजाबसोबतच हिमाचलमध्येही मोठा प्रभाव आहे. बाबा गुरिंदर ३२ वर्षांपासून डेराप्रमुख आहेत.

बातम्या आणखी आहेत...