आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Sindhi Panchayat Explained After Marriage, Do Not Talk To The Daughter On The Phone For More Than 5 Minutes.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुटते नाते वाचवण्याचा प्रयत्न:माहेरच्या लोकांनी नवविवाहीत मुलीसोबत फोनवर 5 मिनिटांपेक्षा जास्त बोलू नका, सिंधी पंचायतची ताकीद

भोपाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंधी समाजात दरमहा 80 हून अधिक घटना पती-पत्नीच्या वादाचे पोहोचत आहेत

मुलीच्या लग्नानंतर किमान दोन वर्षे माहेरच्यांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करू नये अशी ताकीद सिंधी पंचायतीने दिली आहे. जर तुम्हाला त्या मुलीशी बोलायचे असेल तर पाच मिनिटांत हालचाल विचारून फोन ठेवावा असेही सांगण्यात आले. तसेच सासरच्या लहान-सहान गोष्टी माहेरी न सांगण्याची मुलींना समज दिली आहे.

सिंधी समाजात दरमहा 80 हून अधिक घटना पती-पत्नीच्या वादाचे पोहोचत आहेत. यातील अनेक दाम्पत्यांचे लग्न होऊन दोन वर्षदेखील झालेले नाही. पंचायतीने तपास केला असता, मुलीच्या माहेरील लोकांचा हस्तक्षेप या वादाचे मूळ असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सिंधी समाजाने अशाप्रकारीच ताकीद दिली आहे. स्थानिक स्तरावर गठीत 28 सिंधी पंचायती आणि केंद्रीय सिंधी पंचायत येथे दाखल झालेल्या प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय सिंधी पंचायत समितीत पाच सदस्य

कौटुंबिक वादासह इतर प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी तयार झालेल्या केंद्रीय सिंधी पंचायतीत पाच सदस्य आहेत. यामध्ये ज्येष्ठ वकील आणि मानसशास्त्रीय समुपदेशकांचा समावेश आहे. ही समिती समाज पातळीवरच प्रकरण सोडविण्यासाठी प्रयत्न करते. आमच्याकडे अशा प्रकरणे हाताळण्यासाठी 28 पंचायती काम करत आहेत.

अनेक वेळा हुंडाप्रकरणात अडकविण्याची धमकी दिली जाते

केंद्रीय सिंधी पंचायतीत पोहोचलेल्या 95% प्रकरणांमध्ये दिसून आले की, माहेरच्यांनी जास्त हस्तक्षेप केल्यामुळे नववधून सासरी रुळत नाही. मुलाच्या कुटुंबाची एकच तक्रार आहे की त्यांची सून संपूर्ण वेळ तिच्या माहेरच्यांसोबत फोनवर बोलत असते. यावरून तिला बोलले तर हुंडाबळीची धमकी दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...