आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Single Farmer Took Over The Responsibility Of Providing Food To Six Thousand Families In 80 Villages; Spend 50 Lac

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:एकट्या शेतकऱ्याने उचलली 80 गावांच्या सहा हजार कुटंुबीयांना पाेसण्याची जबाबदारी; 50 लाख केले खर्च

जोधपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडून शेतकरी पाबुराम यांचे खास शब्दांत काैतुक
  • अातापर्यंत ५० लाख खर्च करून दिली सर्वांना मदत

कोरोनाच्या संकटात सापडलेल्यांच्या  मदतीसाठी अाता जगाच्या कानाकाेपऱ्यातून दाते समाेर येत अाहेत. अापापल्या परीने सर्व जण मदत करताना दिसतात. यामध्ये जाेधपूरच्या एकट्या शेतकऱ्याकडून हाेत असलेली मदत ही सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरत अाहे. याशिवाय त्यांचे हे सामाजिक कार्य सर्वांसाठीच लक्षवेधी ठरणारे अाहे. जाेधपूर  जिल्ह्याच्या उम्मेदनगरमधील शेतकरी    पाबूराम मंडा यांनी जवळपासच्या ८० गावांतील तब्बल ६ हजार कुटंुबीयांना पाेसण्याची सामाजिक जबाबदारी उचलली. यासाठी त्यांनी अायुष्यात जमा केलेली ५० लाखांची कमाई खर्च केली. यामुळे लाॅकडाऊनच्या काळात राेजगार नसल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ अाली अाहे. अशात या सर्वांना अाता शेतकरी पाबुराम मंडा हे देवदूताच्या भूमिकेत गवसले अाहते. यांच्या मदतीमुळे या सर्व कुटंुबीयांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले अाहे.  

माेदींनी केले खास काैतुक  

उतारवयात असताना अापल्या जवळची सर्वच संपत्ती सामाजिक कार्यावर खर्च करण्याचे माेठे धाडस शेतकरी पाबुराम मंडा यांनी दाखवले. या कामामुळे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शेतकरी पाबुराव अाणि  त्यांची पत्नी मुन्नीबाई यांचे काैतुक केले तसेच अाभार मानले.

बातम्या आणखी आहेत...