आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकशीचे आदेश:कांडलाकडे जाणारे स्पाईसजेटचे विमान पुन्हा मुंबईत उतरवले

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या कांडला शहराकडे उड्डाण केलेल्या स्पाइसजेटच्या एका विमानाचे परत मुंबईला लँडिग करावे लागले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. स्पाइसजेट विमानाने उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाडाच्या गेल्या ४० दिवसांमध्ये ९ घटना घडल्या आहेत.

हवाई वाहतूक संचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी या घटनेची चाैकशी सुरू केली आहे. एक दिवसापूर्वीच डीजीसीएने स्पाइसजेटच्या ५० टक्के उड्डाणांवर दोन महिने बंदी घातली आहे. या कालावधीत डीजीसीए स्पाइसजेटच्या विमानांवर खास निगराणी ठेवणार आहे. ऑफ सीझन असल्याने उड्डाणांची संख्या यापूर्वीच घटवण्यात आली असल्याने संचालनालयाच्या आदेशामुळे उड्डाणांवर विपरीत परिणाम होणार नाही, असा दावा स्पाइसजेटने केला होता.

कंपनी तोट्यात : खासगी एअरलाइन्स स्पाइसजेट गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात आहे. सन २०१८-१९ मध्ये ३१६ कोटी, सन २०१९-२० मध्ये ९३४ कोटी आणि २०२०-२१ मध्ये ९९८ कोटींचा तोटा झाला आहे.

सर्व ठिकाणी अभियंते नियुक्त : स्पाइसजेटने आपल्या सर्व स्टेशन्सवर कुशल अभियंते नियुक्त केले आहेत, असे डीजीसीएने सांगितले. गेल्या ४५ दिवसांत सातत्याने विमानात बिघाड होत असल्याने त्यांना तंत्रज्ञ नियुक्त करण्यास सांगण्यात आले आहे. उड्डाणांपूर्वी अपुरे आणि अकुशल अभियंते विमानांची तपासणी करून प्रमाणपत्र देत आहेत, असे डीजीसीएने १८ जुलै रोजी नमूद केले होते. त्यानंतर कंपनीस २८ जुलैपर्यंत योग्य तंत्रज्ञ, अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...